मुंबईसह राज्यात काही भागात वरुणराजाची हजेरी, कोकणाला आज यलो अलर्टचा इशारा
Maharashtra Mansoon Updates: सकाळपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात वरुणराजाने हजेरी लावली आहे. तर कोकणात आज यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 2, 2023, 07:11 AM IST
मुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.
Jun 29, 2023, 11:53 AM ISTMonsoon Update । राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
IMD Orange Alert For Next Five Days In Various Parts Of Maharashtra
Jun 28, 2023, 09:00 AM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM ISTMonsoon Update । पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
Rain News, Monsoon expected From Tomorrow
Jun 22, 2023, 08:30 AM ISTपुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
Maharashtra Mansoon Update : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jun 21, 2023, 11:51 AM ISTबिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
Jun 13, 2023, 04:04 PM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTRain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू
Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.
Jun 11, 2023, 07:44 AM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTराज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTमान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल
Monsoon Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
May 23, 2023, 09:48 AM ISTमान्सूनबाबत मोठी बातमी, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Maharashtra Weather: मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे.
May 3, 2023, 12:57 PM ISTMaharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
Apr 30, 2023, 07:39 AM IST