'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका

अनेकदा येणारे अनोळखी नंबर सहज उचलतो. पण ही एक तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. याचा संबंध थेट तुमच्या बँक अकाऊंटशी जोडला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 23, 2024, 09:44 AM IST
'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका title=

1 ऑक्टोबरपासून फेक कॉल्स आणि मेसेज कमी होतील. या बदललेल्या नियमामुळे थेट नेटवर्कवर फेक कॉल्स आणि मेसेज थांबतील. तसेच टेलिकॉम कंपन्या AI सारख्या नवीन पद्धतींद्वारे हे घोटाळे थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ट्रायने एक नवीन नियम बनवला आहे ज्यामुळे 1 ऑक्टोबरपासून फेक कॉल्स आणि मेसेज कमी होतील. या नियमामुळे थेट नेटवर्कवर फेक कॉल्स आणि मेसेज थांबतील. तसेच टेलिकॉम कंपन्या AI सारख्या नवीन पद्धतींद्वारे हे घोटाळे थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु स्कॅमर इंटरनेट कॉल वापरण्यासारख्या नवीन पद्धती देखील शोधत आहेत.

थायलंड दूरसंचार प्राधिकरणाच्या मते, थायलंडमध्ये इंटरनेटवरून कॉल करणाऱ्या लोकांकडे +697 किंवा +698 ने सुरू होणारे नंबर असतात. हे कॉल ट्रेस करणे खूप कठीण आहे, त्यामुळे स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांचा वापर करतात. हे लोक व्हीपीएन वापरून त्यांचे लोकेशन लपवण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे त्यांना पकडणे आणखी कठीण होते.

कसा ओळखाल हा फ्रॉड?

तुम्ही चुकूनही यापैकी एका कॉलला उत्तर दिले तरी कोणताही वैयक्तिक डेटा देऊ नका. हे लोक कदाचित म्हणतील की, ते सरकार किंवा बँकेतून फोन करत आहेत. जर त्यांनी तुम्हाला कोणतीही माहिती विचारली तर त्यांना सांगा की, तुम्ही त्यांना परत कॉल कराल. जर त्यांनी तुम्हाला परत कॉल करण्यासाठी नंबर दिला नाही, तर समजून घ्या की हा घोटाळा आहे.

तक्रार कशी करायची?

सरकारने चक्षू पोर्टल नावाची नवीन वेबसाइट तयार केली आहे. यावर जाऊन तुम्ही फेक कॉल्स आणि मेसेजची तक्रार करू शकता. तुम्हाला एखाद्या कॉल बद्दल मनात शंका असेल तर तुम्ही तो कॉल किंवा मेसेज आला तर तुम्ही या वेबसाइटवर जाऊन तक्रार करू शकता. फ्रॉड कॉल आणि मॅसेजपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.