मुंबई : चीनसाठी कोरोना विषाणू (Coronavirus) माहामारी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरत आहे. १००० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या आपला कारभार चीनमधून गुंडाळण्याच्या विचारात आहेत. या कंपन्या भारत सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या बाबत अनेक देशांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. जर या कंपन्यांनी भारतात व्यवसाय सुरु केला तर देशात हजारो लोकांच्या हाताला रोजगार मिळेल.दरम्यान, यापार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्य सक्रीय झाली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार कोरोना विषाणूच्या माहामारीमुळे अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या जवळजवळ १००० परदेशी कंपन्या भारत सरकारच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून भारतात कारखाने सुरु करण्याबाबत चर्चा करत आहेत. किमान ३०० कंपन्या आहेत. या कंपन्या मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिवाइसेज, टेक्साटाइल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्सच्या क्षेत्रात भारतामध्ये कारखाने सुरु करण्यासाठी सरकारच्या संपर्कात आहेत. दरम्यान, यशस्वी चर्चा झाली तर चीनसाठी खूप मोठा झटका आणि फटका बसणार आहे.
या कंपन्या भारतात एक वैकल्पिक मॅन्युफॅक्चरिंग हब रुपात पाहत आहेत. त्यांनी सरकारी पातळीवर विविध स्तरांवर प्रस्ताव सादर केले आहेत. यात विदेशात भारतीय दुतावास तथा राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांने सांगितले साधारण १००० कंपन्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सेल, केंद्रीय सरकार विभाग आणि राज्य सरकार यांच्याशी चर्चा केली आहे. या व्यवसायात आम्ही ३०० कंपन्यांचे लक्ष वेधले आहे. '
चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या काढता पाय घेणार आहे. यापार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्य सक्रीय झाली आहेत. यात उत्तर प्रदेश, ओडिशा, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश आदी राज्य सक्रीय झाली आहेत. या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी काहींना कामही सुरु केले आहे. राज्य सरकार कारखान्यांसाठी जमीन शोधण्याचे काम करत आहेत. राज्य सरकार विना अडचण व्यवसाय करण्यासाठी अनेक नवीन नियम आणि अटी लागू करत आहेत.