नवी दिल्ली: व्हिडिओ कॉलिंगचा वापर मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसते आहे. याआधी गुगल ड्युओ (Duo)ऍन्ड्राइड ऍपच्या माध्यमातून एकाच व्यक्तीला व्हिडिओ कॉलिंग करता येत होती. परंतु, एकाचवेळी अनेक लोकांना व्हिडिओ कॉलिंग करता यावे, म्हणून गुगलने 'लाइट मोड' नावाचे नवे फिचर आणले आहे. ऍन्ड्राइड पोलीस (ऍन्ड्राइड पोलीस हा ऍन्ड्राइड संबंधित प्रत्येक गोष्टींची माहिती देणार ब्लॉग आहे) अहवालात असे सांगण्यात आले आहे की, ड्युओ ऍपच्या युजर्सकडून ग्रुप कॉलिंगची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते आहे. ऍपल स्मार्टफोनमध्ये एकाच वेळी ३२ जणांना व्हिडिओ कॉलिंग करता येते. 'ऍपल' सारखी सुविधा गुगलच्या 'ड्युओ ऍपमध्ये देण्यात येणार आहे.
ज्या लोकांना व्हिडिओ कॉलिंग करायचे आहे, अशा लोकांच्या फोननंबरची यादी युजर्सला तयार करावी लागणार आहे. त्यानंतरच व्हिडिओ कॉलिंग करता येऊ शकणार आहे. व्हिडिओ कॉलिंग करताना युजर्सला फोनच्या डाव्या बाजूस निवडलेली यादी दिसणार आहे. तसेच युजर्सला ज्या लोकांना व्हिडीओ कॉलिंग करायचे आहे. अशा सदस्यांची यादीतून निवड करुन त्यांना व्हिडिओ कॉल केला जाऊ शकतो.
नवीन फिचर 'लाइट मोड'चा युजर्सला आणखी एक फायदा होणार आहे. 'लाइट मोड'मुळे युजर्सला अंधारात किंवा कमी प्रकाशातदेखील चांगले चित्र दिसणार आहे. मात्र, या फिचरला कधी सुरू करण्यात येणार आहे, याची माहिती अद्याप मिळाली नाही. सध्या, सर्वसाधारण युजर्सला हा ऍप डाऊनलोड करता येणार नाही. केवळ निवडक युजर्ससाठी याचे परीक्षण करण्यात येते आहे.