Hero HF Deluxe: भारतीय बाजारपेठेत कॉम्प्यूटर बाइक्सला खूप मागणी आहे आणि या सेगमेंटमध्ये हिरो मोटोकॉर्पचा चांगलाच दबदबा आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपलं प्रसिद्ध मॉडेल Hero HF Deluxe ला अपडेट करत नवं मॉडेल बाजारात लाँच केलं आहे. कंपनीने या बाइकमध्ये नवीन मानकांनुसार, अपडेटेड इंजिनिसह काही खास फिचर्स समाविष्ट केले आहेत. जे कॉम्प्यूटर बाइक म्हणून तिला उत्तम बनवतात.
Hero HF Deluxe ला कंपनीने दोन व्हेरियंटमध्ये लाँच केलं आहे. याच्या बेस मॉडेल किक-स्टार्टची किंमत 60 हजार 760 रुपये आहे. तर सेल्फ-स्टार्ट मॉडेलची किंमत 66 हजार 408 रुपये आहे. ही किंमत दिल्लीतील एक्स-शोरुममधील आहे. ही बाईक चार नव्या रंगात सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये नेक्कस ब्ल्यू, कँडी ब्लेजिंग रेड, ब्लॅकसह हेवी ग्रे आणि स्पोर्ट्स रेड रंग आहेत. तसंच कॅनव्हास ब्लॅक (Canvas Black) व्हेरियंटही सादर करण्यात आलं आहे.
Canvas Black मॉडेल पूर्णपणे ब्लॅक थीमने सजवण्यात आलं आहे. यामध्ये बॉडीवर डिकेल दिलेलं नाही. तसंच फ्यूइल टँक, बॉडी वर्क, फ्रंट व्हायजर, ग्रॅब रेल, अलॉय व्हील, इंजिनसह एक्झॉस्ट कव्हर सर्व काही काळ्या रंगात आहे, जे बाईकला स्लीक लूक देतात. कमी किंमतीत स्पोर्टी लूकचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Hero HF Deluxe भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असून Spelndor Plus नंतर या ब्रँडची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. 2023 एचएफ डिलक्सला एका नवा स्ट्राइप्स पोर्टफोलियो मिलतो जो बाईकसाठी एक नवी ग्राफिक्स थीम आहे. नवा स्पोर्टी लूक बाईकला अधिक आकर्षक करतो. नव्या स्ट्राइप ग्राफिक्समध्ये हेडलँप काऊल, फ्यूइल टँक, साइड पॅनेल आणि अंडर सीट पॅनल पाहिलं जाऊ शकतं.
कॉम्प्यूटर बाईकच्या या इंजिनला RDE नियमांतर्गत अपडेट करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीकडून 97.2 सीसी क्षमतेचं एअर-कूल्ड सिंगल सिंलेडर इंजिन वापरण्यात आलं आहे. जे 8 पीएसची पॉवर आणि 8 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते ज्याला 4-स्पीड गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. 2023 हिरो सेल्फ आणि सेल्फ i3S व्हेरियंटमध्ये ट्यूबलेस टायर्स स्टँडर्ड म्हणून मिळतात. तर युएसबी चार्जर पर्यायी देण्यात आला आहे. इतर फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास, बाईकमध्ये साइड स्टँड कट ऑफ, पडल्यानंतर इंजिन कट ऑफ आणि 130 मिमीचा ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.