मुंबई : भारतात मागील अनेक दिवसांपासून one plus 5 T या फोनची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. भारतात मोबाईल मार्केटमधील स्पर्धा वाढली असून जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या कंपनीचा नवीन मोबाईल लाँच होत आहे.
या फोनची लावा रेड एडिशन देशात नुकतीच लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर या मोबाईलचाही एक पर्याय आहे.
या फोनची किंमत ३७,९९९ रुपये आहे. भारतात तो प्रत्यक्ष विक्रीसाठी २० जानेवारीला अमेझॉनच्या सेलवर उपलब्ध होईल, असं सांगण्यात येत आहे.
या फोनचे काही मुख्य फिचर्स असे आहेत - ६ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि १२८ जीबी एक्स्पांडेबल मेमरी देण्यात आली आहे. या फोनची डिझाईन आणि फिचर्स आकर्षक असल्याने तो ग्राहकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास कंपनीचे महाप्रबंधक विकास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.
यामध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट आणि २० मेगापिक्सल बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. याबरोबरच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वापरला आहे. तर ६ इंचाची स्क्रीन असलेल्या या फोनला फुल-ऑप्टिक एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.