रेडमी नोट 9 5G, रियलमी7 5G आणि मोटोजी 5G पैकी कोणता स्मार्टफोन घ्याल ? जाणून घ्या

आपला Moto G 5G स्मार्टफोन बाजारात आणलाय. याच्या ठिक आधी  Redmi Note 9 5G आणि Realme 7 5G बाजारात आलेयत.

Updated: Dec 1, 2020, 03:55 PM IST
रेडमी नोट 9 5G, रियलमी7 5G आणि मोटोजी 5G पैकी कोणता स्मार्टफोन घ्याल ? जाणून घ्या  title=

नवी दिल्ली : नुकतेच अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी आपले 5 जी स्मार्टफोन बाजारात लॉंच केले. या आठवड्यात मोटोरोलाने (Motorola)आपला Moto G 5G स्मार्टफोन बाजारात आणलाय. याच्या ठिक आधी  Redmi Note 9 5G आणि Realme 7 5G बाजारात आलेयत. त्यामुळे आता यातील कोणता स्मार्टफोन सर्वात बेस्ट आहे ? याबद्दल ग्राहकांच्या मनात प्रश्न आहेत. तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन चांगला ठरेल हे जाणून घेऊया.

डिझाइन 

Redmi Note 9 5G, Realme 7 5G आणि Moto G 5G यापैकी कोणताही डिव्हाईस प्रिमियम क्वालिटी ऑफर देत नाही. सर्व स्मार्टफोनमध्ये प्लास्टिक बॉडी दिली गेलीय. दरम्यान रियलमी ७ ५जी हा इतर दोन हॅंडसेटच्या तुलनेत पातळ आणि कमी वजनाचा आहे. 

डिस्प्ले 

Redmi Note 9 5G, Realme 7 5G आणि Moto G 5G चे डिस्प्ले वेगवेगळे आहेत. रियलमी७ ५जीचा डिस्प्ले इतर दोन्ही मोबाईलच्या तुलनेत चांगला दिसतो. याचा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेटसोबत येतो. मोटोरोला मोटोजी ५जी मध्ये LTPS टेक्नोलॉजी वापरण्यात आलीय. तर 
Redmi Note 9 5G मध्ये केवळ IPS Panel आहे.

कॅमेरा 

रियलमी७ ५जी मध्ये जास्त रियर कॅमेरा आहेत. मॅक्रोसच्या या हॅंडसेटमध्ये २ एमपीचा एडीशनल कॅमेरा दिला गेलाय. तर मोटोरोलामध्ये ब्राईटर फोकल एप्रेचर दिला गेलाय. कॅमेरा तुलनेत रेडमी चांगला नाहीय.

बॅटरी 

बॅटरीच्या बाबतीत ५जी टेक्नोलॉजीचे तीन स्मार्टफोन एकसाररखे आहेत. तीन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलीय.