फेसबुक वापरकर्त्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. फेसबुकवरुन मिळणाऱ्या लाईक्स आणि कंमेट तुम्हाला फेसबुकवर अडकून ठेवण्याचे काम करीत असतात. मोबाईलमधून येणारा आवाज तुम्हाला नेहमी मोबाईलमध्ये डोकावून बघण्यासाठी भाग पाडतो. एकीकडे मोबाईल वापराचे प्रमाण कमी करा, असे सांगण्यात येत असते. मात्र, फेसबुकचा वापर कमी केल्यास किती पैसे वाचवू शकतात, याचाही अभ्यास करण्यात आला आहे. दिवसभरात, आठवड्यात आणि वर्षात तुम्ही फेसबुकचा किती वापर करता, याचा अभ्यास करण्यात आला. फेसबुक सो़डण्याचा विचार केला तर दिवसाला, आठवड्याला आणि वर्षाला किती रुक्कम वाचवू शकता याचा अभ्यास करण्यात आला आहे.
जर तुम्ही एका वर्षासाठी फेसबुकवरुन खाते डिअॅक्टिव्हेट केले तर सरासरी १ हजार डॉलर ( ७० हजार कोटी रुपये ) वाचवण्याचे समाधान तुम्हाला मिळणार आहे. हा आकडा मिडवेस्टन महाविद्यालयात झालेल्या संशोधना दरम्यान लिलावाच्या माध्यमातून ठरविण्यात आला.
फेसबुक बंद करण्यासाठी एक दिवसापासून तर वर्षभरापर्यंतच्या कालावधीसाठी किती रक्कम वाचेल, हे सांगण्यात आले आहे. संशोधनाचे मुख्य लेखक, ओहियो स्थित केनयन महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक कॉरिगन यांनी सांगितले की, लोक फेसबुकवर लाखो तास खर्च करतात, आम्ही पैशाच्या रुपात वेळेचे महत्व जाणून घेत होत. फेसबुकवर २.२ अब्जपेक्षा जास्त युजर्स आहेत.
मिडवेस्टन महाविद्यालयात १२२ विद्यार्थांकडे लिलाव करण्यात आला. या लिलावात एका दिवसाची सरासरी ४.१७ डॉलर आहे. साप्ताहिक सरासरी ३७ डॉलर आहे. वार्षिक सरासरी १ हजार ५११ ते ९ हजार ०८७ डॉलर इतकी आहे.
मिडविस्टन शहरात १३३ विद्यार्थी आणि १३८ प्रौढांमध्ये लिलाव करण्यात आला. लिलावात विद्यार्थ्यांकडून लावण्यात आलेल्या बोलीची वार्षिक सरासरी २ हजार ०७६ डॉलर आहे तर प्रौढाकडून लावण्यात आलेल्या बोलीची सरासरी १ हजार १३९ डॉलर आहे. या दोन्हीतून वार्षिक सरासरी ठरविण्यात आली आहे.