मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय. तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.
दरम्यान, महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने सोशल मीडियावर #MeToo नावाचे कॅम्पेन सुरु केलेय. त्यानंतर 'तारक मेहता' फेम बबिताने आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा फोडलेय.
मुनमुनने #MeToo हा हॅशटॅग वापरत पोस्ट केलेय, 'मी पाहात आहे की #MeToo हॅशटॅग वापरून महिलांनी सांगितलेल्या आपबीतीमुळे आपल्या आजुबाजूचे पुरुष त्रस्त झाले आहेत. मात्र त्रस्त होऊ नका हे तुमच्या आजूबाजूलाही होत आहे. तुमच्या घरात, बहिणीसोबत, मुलीसोबत, आईसोबत आणि पत्नीसोबतही होत आहे. एवढेच नाही तर तुमच्या नोकराणीसोबतही ते झाले आहे.
मुनमुन आपल्यावर झालेल्या लहानपणीच्या अन्यायाची थेट माहिती दिलेय. माझ्या शेजारी राहणारे काका मला मुद्दाम जोरदार मिठी मारायचे. मी काही कोणाला सांगू नये म्हणून ते मला धमकी द्यायचे. माझ्यापेक्षा मोठे असणारी मामाची मुलं अश्लिल इशारे कराचीत. माझ्या जन्माच्या वेळी रुग्णालयात येऊन मला पाहणाऱ्या एका व्यक्तीने मी १३ वर्षाची झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने हात लावले होते.