मोरा चक्रीवादळाचा तडाखा , 6 नागरिकांचा मृत्यू

बांग्लादेशच्या किनाऱ्याला मोरा चक्रीवादळानं तडाखा दिलाय. यामध्ये किमान 6 नागरिकांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 30, 2017, 09:19 PM IST
मोरा चक्रीवादळाचा तडाखा , 6 नागरिकांचा मृत्यू title=
Photo courtesy: cyclocane.com

ढाक्का : बांग्लादेशच्या किनाऱ्याला मोरा चक्रीवादळानं तडाखा दिलाय. यामध्ये किमान 6 नागरिकांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.  

चक्रीवादळामुळे कॉक्स बाजार जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या सुमारे 3 लाख नागरिकांचं स्थलांतर करावं लागलंय. वादळामुळे परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. यामध्ये एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं तर अन्य पाच जणांचा मृत्यू हा झाडं किंवा घरांवरून पडल्यामुळे झाल्याचं समजतंय. 

मोरा वादळामुळे बांगलादेशच्या उत्तर किनाऱ्यावर ताशी 130 ते 150 किलोमीटर वेगानं वारे वाहतायत. चितगाँग आणि कॉक्स बाजारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्व उड्डाणं स्थगित ठेवण्यात आलीयेत.

म्यानमारमधून स्थलांतर करून आलेल्या आणि तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या रोहिग्य निर्वासितांनाही वादळाचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.