Viral Video News:नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य धावपळीचं असतं. घड्याळ्याच्या काट्यावर आयुष्य जगावं लागतं असं म्हणायला हरकत नाही. ऑफिसमध्ये काम करताना वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत काम करावं लागतं. त्यामुळे ताणतणावासोबत कामाचं प्रेशर असतं ते वेगळं...बॉसच्या मूडवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यावर दिवस कसा जाईल? याची गणितं बांधली जातात. त्यामुळे बॉस आणि कर्मचारी यांचं विळ्या भोपळ्याचं नातं असतं, असंच म्हणावं लागेल.
तुम्हालाही काम करताना बॉसचा वाईट अनुभव आला असेल? त्याची तीव्रता कमी अधिक असू शकते. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. या व्हायरल व्हिडीओत एका कर्मचाऱ्याला बॉस चक्क दांड्याने मारत असल्याचं दिसत आहे. मलेशियातील सेरेम्बन येथील इनमॅक्स इंडस्ट्रीज या बांधकाम कंपनीत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडीओनुसार, एक तैवानचा बॉस इनमॅक्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्याला दांड्याने मारहाण करत आहे. क्लिपमध्ये बॉस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. कर्मचारी बॉसचं रौद्र रूप पाहून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही बॉसला दया येत नाही आणि मारण्यासाठी मागे धावतो. व्हिडीओ शेअर करताना एका ट्विटर यूजरने लिहिले की, 'कृपया हा व्हिडिओ व्हायरल करा कारण हा बॉस अनेक वर्षांपासून आपल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहे आणि यावर काहीच कारवाई होत नाही. कृपया अशा प्रकारची मारहाण बंद करा.'
Aksi bos pukul pekerja di kilang INMAX TTJ Senawang.
Please viral this video because this boss hitting his staff too many years no one take action. Please stop this kind of cruelty.
Kredit topfan serembanpage
Video 13 pic.twitter.com/Bh0oCYRdW9— nan manjoi8715 (@nanmanjoi8715) August 14, 2022
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून व्हिडीओची सत्यता तपासली जात आहे. या घटनेबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. वृत्तानुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. अनेक युजर्संनी इनमॅक्स इंडस्ट्रीजवर टीका केली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीत अशा अनेक घटना झाल्याचा दावा त्यांनी केला.