Coronavirus : आता अंटार्क्टिकामध्येही कोरोना दाखल

चिली सेंटरमध्ये ३६ जणांना कोरोनाची लागण 

Updated: Dec 23, 2020, 01:17 PM IST
Coronavirus : आता अंटार्क्टिकामध्येही कोरोना दाखल  title=

मुंबई : कोरोना आता जगभरात पसरला आहे, असं म्हणायला हरकत नाही.  कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहिलेल्या अंटार्क्टिका खंडावरही कोरोनाचा फैलाव झाला आहे. फक्त अंटार्क्टिका हे एकमेव असं खंड होतं जिथे अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पण आता डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अंटार्टिकाच्या रिसर्च सेंटवर ३६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सोमवारी अंटार्क्टिकामधील चिली सेंटरमध्ये लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. संक्रमीतांमध्ये २६ जण सेनेचे तर १० लोकं मेंटेनेंसमधील आहेत. चिलीच्या सेनेने म्हटलं आहे की, त्यांनी कोरोनाबाधित लोकांना पुन्हा बोलावलं आहे. 

अंटार्क्टिकाने या अगोदर पर्यटकांसाठी प्रवास बंद केला होता. जेणेकरून महाद्वीप कोरोनामुक्त राहिल. आता असं म्हटलं जातंय की,२७ नोव्हेंबर रोजी चिलीमधून काही सामान अंटार्क्टिकामध्ये पोहोचलं होतं. यामधूनच लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

अंटार्क्टिकात सामान उतरवल्यानंतर जेव्हा लोकं परतले तेव्हा काही दिवसांनी क्रू मेंबर्समध्ये व्हायरस सापडला. चिली सेनेने म्हटलं की, सप्लाय पाठवण्या अगोदर सगळ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली होती. तेव्हा सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. 

अंटार्क्टिकात अनेक देशात रिसर्च बेस आहेत. कोरोनाच्या बचावासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले होते. लोकांना भेटण्यास मज्जाव केला आहे. या करता रिसर्च अभियान राबवण्यात आलं आहे.