मुंबई : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने क्रृरतेचा कहर गाठला आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पतीचीच हत्या केली आहे. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने नवऱ्याच्या प्रायवेट पार्ट काढून चक्क पॅनमध्ये शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय महिला दयाने क्रिस्टीना रोड्रिग्स मचाडो (Dayane Cristina Rodrigues Machado)हिला अटक करण्यात आली आहे. साओ गोंकालो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा बायकोमध्ये वाद झाला. या वादानंतर महिलेने हिंसक वळण घेतलं. या महिलेने आपल्या नवऱ्याची हत्या केली. यानंतर आरोपीने आपल्या नवऱ्याचं प्रायव्हेट पार्ट काढून पॅनमध्ये शिजवलं.
हे दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून एकत्र राहत होते. मात्र काही वेळेपासून यांच्या नात्यातील ताण वाढत होता. यानंतर या दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र असा निर्णय घेऊनही हे दोघं एकत्र येतच राहिले.
या दोघांना 8 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी आहे. घटना घडली तेव्हा मुलं कुठे होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. हे दाम्पत्य एक पिझ्झा शॉप चालवत असे.
पोलिसांच म्हणणं आहे की, आरोपीकडून हा गुन्हा सात जून रोजी पहाटे 4 वाजता घडला. दाम्पत्यामध्ये खूप मोठा वाद झाला. हा वाद झाल्यानंतर पोलिसांना भाजी कापणारा चाकू घटनास्थळी सापडला. याच चाकूने महिलेने आपल्या नवऱ्याची हत्या केली. त्यानंत आता या महिलेला हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या आरोपात अटक केरण्यात आली आहे.
त्या मृत व्यक्तीचे नाव आंदे आहे. घडलेला संपूर्ण प्रकार आंद्रे यांच्या शेजारच्यांनी पोलिसांना कळवला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. एका खोलीत आंद्रे यांचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीतील संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी मृतांचा खासगी पार्ट फ्राइंग पॅनमध्ये शिजताना दिसला.
डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य बारमध्ये गेले होते. तेथे त्यांनी खूप नशा केली. यानंतर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या वकिलांनी असा दावा केला आहे की, नवऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर तिने स्वरक्षणासाठी नवऱ्याला मारलं.