Indian employee wins case: तामिळनाडूतील 37 वर्षीय रामलिंगम मुरुगन यांना 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. एका सिंगापूरस्थित कंपनी विरुद्धच्या खटल्यात त्यांनी ही केस जिंकली आहे. त्यानंतर कोर्टाने रामलिंगम यांना 60 लाख रुपये नुकसान भरपाई करण्याचे निर्देश कंपनीला दिले आहेत. गर्दीत लॉरीच्या निष्काळजीपणाप्रकरणी ही केस सुरु होती.2021 मध्ये मुरुगन हे गर्दीच्या ट्रकमधून खाली उतरताना पडले, यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला.
3 जानेवारी 2021 रोजी घडलेल्या या अपघातानंतर मुरुगन पाच महिने काम करू शकले नव्हते. मुरुगन यांनी 2022 मध्ये रिगेल मरीन सर्व्हिसेस विरुद्ध खटला दाखल केला असून 1 लाख सिंगापूर डॉलर्स ($73,500) ची भरपाई मागितली. आपल्यासोबत इतर कामगारांना पुरेसे संरक्षण नसल्याने ही घटना घडल्याचा ठपका कंपनीविरोधात ठेवण्यात आला.
गच्च भरलेल्या लॉरीवरून पडल्याने मुरुगन हे जखमी झाले. विशेषत: जड बांधकामाशी संबंधित असलेल्या कंपन्यानी जोखमीचे मूल्यांकन हलकेपणाने गांभीर्याने घ्यायला हवे होते. पण रिगेल मरीन सर्व्हिसेसच्या प्रतिनिधींनी या दाव्यांचे खंडन केले आणि मुरुगनचा अपघात त्यांच्याच निष्काळजीपणामुळे झाला असे रामलिंगम मुरुगन यांचे वकील मुहम्मद अश्रफ सय्यद अन्सराई यांनी सांगितले. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायाधीशांनी मुरुगनच्या बाजूने निर्णय दिला.
या घटनेमध्ये मुरुगनच्या बाजूने कोणताही निष्काळजीपणा आढळला नाही. अपघात झालेल्या वाहनात 22 पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते, त्यामुळे अपघात झाल्याचे जिल्हा न्यायाधीश टॅन मे टी यांनी सांगितले.
भारत, व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनमधील लाखो मजूर दरवर्षी नोकरीच्या संधी आणि चांगल्या पगाराच्या दृष्टीने सिंगापूरमध्ये स्थलांतर करत असतात. हे सर्व मजूर वसतिगृहात राहतात आणि त्यांना लॉरीने कामावर पाठवले जाते. अनेक मजूर कोणत्याही सीट बेल्ट आणि सुरक्षेशिवाय खचाखच भरलेल्या लॉरीमध्ये जाऊन अपघाताचे बळी ठरत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.