मुंबई : जगभरातून गुन्हे आणि न्यायालयातील अनेक घडणारे अनेक प्रकरणं समोर येत असतात. सगळ्या देशांमध्ये चुक केली की शिक्षाही दिली जाते. पण विचार करा जर एखाद्या व्यक्तीला चूक नसताना तीस वर्षे तुरुंगात घालवावी लागली, तर प्रत्येकाला वाईट वाटलं. इतकंच नाही तर ती व्यक्ती तुरुंगातून बाहेर आली आणि मरण पावली तर त्या गोष्टीचे ही आश्चर्य वाटेल.
अमेरिकेतील टेनेसी शहरातून सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. टेनेसी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याची संपूर्ण कहाणी जगासमोर आली. मिररच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, क्लॉड फ्रान्सिस गॅरेट असे या व्यक्तीचे नाव होते. नुकतेच या व्यक्तीचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. क्लॉड फ्रान्सिस गॅरेट हा तीस वर्षांची शिक्षा भोगून काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.
रिपोर्टनुसार, तीस वर्षांपूर्वी हा माणूस त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहत होता आणि त्या जागेवर अचानक आग लागली. या घटनेत गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्यामुळे त्यानेच जाणीवपूर्वक आग लावल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. आपण आग लावली नसून तो झोपला होता असे तो वारंवार सांगत राहिला. पण त्याला दोषी ठरवलं आणि त्याला शिक्षा भोगावी लागली.
शिक्षा भोगत असताना शेवटच्या काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी काही पुराव्याच्या आधारे न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयानं संपूर्ण निर्णय रद्द करून क्लॉड फ्रान्सिस गॅरेट निर्दोष असल्याचे सांगत त्याची सुटका केली. पण तुरुंगातून बाहेर येताच काही महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला.