अचानक स्विमिंग पूलमध्ये गाडला गेला माणूस, 43 फूट खाली सापडला मृतदेह

स्वमिंग पूलमध्ये सगळे जण धम्माल करत असताना अशी एक घटना घडली. ज्याचा कोणालाही अंदाज आला नाही.

Updated: Jul 23, 2022, 08:56 PM IST
अचानक स्विमिंग पूलमध्ये गाडला गेला माणूस, 43 फूट खाली सापडला मृतदेह title=

तेल अवीव : जगात कधी कधी काही घटना अशा घडतात ज्या पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. काही गोष्टी तर इतक्या भंयकर असतात ज्यामुळे अंगावर काटाच उभा राहतो. अशी एक घटना इस्राईलमध्ये घडली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही धक्का बसेल.

स्विमिंग पूलच्या खाली असलेलं सिंकहोल उघडल्याने पूल पार्टीचे रूपांतर भीषण अपघातात झाले. लोक पूलमध्ये मज्जा करत असताना एका घटनेनं संपूर्ण मज्जा दु:खात बदलली.

पूलच्या मधोमध असलेला एक सिंकहोल उघडला आणि बघता बघता सगळ्या वस्तू त्यामध्ये ओढल्या गेल्या. ज्यामध्ये एका व्यक्तीचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये लोक स्विमिंग पूलमध्ये ओरडताना दिसत आहेत.

इस्रायलमधील तेल अवीवपासून आग्नेयेला 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या करमी योसेफ शहरात गुरुवारी ही घटना घडली. येथे पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक जण उपस्थित होते. पूलमध्ये आंघोळ करताना लोक पार्टीचा आनंद लुटत असताना तलावाच्या तळाशी असलेले सिंकहोल उघडले. पाण्यासह लोकं ही त्याच्याकडे खेचू लागले.
 
43 फूट खोल सिंकहोलमध्ये जाण्यापासून काही जण बचावले असले तरी या अपघातात किही नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले की, घटनेच्या वेळी तेथे सुमारे 6 लोक उपस्थित होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर सुमारे तीन जण जखमी झाले.

काही वेळात पूल रिकामा होतो. लोक घाईघाईने बाहेर पडतात. पण हे सर्व अचानक कसे घडले हे लोकांना समजलेच नाही.