पाकिस्तानात पुन्हा मंदिरांची तोडफोड , पुजाऱ्याला मारहाण, मूर्तीही तोडल्या

पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा धुमाकूळ, मंदिरं आणि हिंदू नागरिकांवर हल्ले सुरूच 

Updated: Jun 9, 2022, 09:24 PM IST
पाकिस्तानात पुन्हा मंदिरांची तोडफोड , पुजाऱ्याला मारहाण, मूर्तीही तोडल्या title=

Mob attacks temple in Pakistan : पाकिस्तानात मंदिरं आणि हिंदू नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. कराचीमधील कोरांगी भागातील श्री मारी माता मंदिरावर हल्ला चढवण्यात आला. मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या पुजाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. मंदिरातील मूर्तींचीही नासधूस केलीय. 

पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाज भयभीत असताना पोलीस मात्र सुस्तच आहेत. या प्रकरणात अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. पाच ते सहा हल्लेखोर मंदिरावर हल्ला करून पसार झाले. पाकिस्तानात मंदिरांवर सातत्यानं हल्ले होत असतात. 

ऑक्टोबर महिन्यात सिंध प्रांतातील कोटरी येथील ऐतिहासिक मंदिरात तोडफोड करण्यात आली.  सिंध प्रांतात हिंदू, शिख, ख्रिश्ननांचं बळजबरीनं धर्मांतर आणि हिंदूंवर हल्ले ही नित्याचीच बाब झालीये. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाज असुरक्षित असून मानवाधिकारांचं सातत्यानं उल्लंघन केलं जात असल्याचे अहवाल आहेत. अल्पसंख्याकांसोबतच महिला, मुलं, पत्रकार यांच्याही सुरक्षेची कोणतीही हमी नाही. 

आपल्या देशाच्या नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरणारा पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्यात मात्र आघाडीवर असतो. काश्मीरच्या प्रश्नावर गरळ ओकण्याऐवजी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आधी तिथली मंदिरं, गुरूद्वारा, चर्च यांची सुरक्षा मजबूत केली पाहिजे...