मुंबई : तरूण-तरूणींमध्ये आजकाल Adult Party करण्याचा ट्रेंड आहे. कोणतेही ओकेजन असो तरूण-तरूणी अशा Adult Party चं आयोजन करून सेलिब्रेशन करत असतात. या पार्ट्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचे सेवन करून तरूण-तरूणी सेलिब्रेशन करतात. मात्र कधी कधी हे सेलिब्रेशन एखाद्याच्या मृत्यूवरही बेतते, अशीच घटना या घटनेत घडलीय.
थायलंडच्या पटॉन्ग रिसॉर्टमध्ये एका Adult Party चे आयोजन करण्यात आले होते. या पार्टी दरम्यान अनेक तरूण-तरूणींनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते. या पार्टी दरम्यान 37 वर्षीय रशियन मॉडेल इव्हगेनिया स्मरनोव्हा (37) हिचा मृत्यू झाला.रेडलाइट एरिया असलेल्या थायलंडमधील फुकेत येथील पटॉन्ग रिसॉर्टमध्ये ही घटना घडली.
Adult Party दरम्यान 8व्या मजल्यावरून पडून वेबकॅम मॉडेल इव्हगेनिया स्मरनोव्हा हिचा मृत्यू झाला. इव्हगेनिया स्मरनोव्हा अपार्टमेंटपासून 80 फूट खाली पडली. आठव्या मजल्यावरून पडल्याने या मॉडेलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर तिचा पायही तुटला. या घटनेत अशीही माहिती समोर आली आहे की, मॉडेलला 80 फूट उंचीवरून फेकले गेले होते.
पुरावा सापडला
थायलंडच्या पोलिसांना या रशियन मॉडेलच्या हातातून केसही सापडले आहेत. स्मरनोव्हाच्या हातात सापडलेल्या केसांच्या फॉरेन्सिक तपासात पोलीस गुंतले आहेत. याद्वारे पोलिसांना त्या लोकांची ओळख पटवता येणार आहे, जे घटनेच्या वेळी मॉडेलसोबत उपस्थित होते.
दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनी एका अमेरिकन व्यक्तीसह अन्य 2 जणांना अटक केली आहे. बेजबाबदार वागणूकीमुळे मॉडेलचा जीव घेतल्याचा आरोप तिघांवर ठेवण्यात आला आहे.