रोम : ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या रहस्यांमधून लोकांना रोमांचित करणाऱ्या अनेक कथा आहेत. पण एक अशी कथा आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 1911 मध्ये 3 बोगी आणि त्यात 106 प्रवासी असलेली एक ट्रेन बोगद्यात शिरल्यानंतर अचानक गायब झाली होती.
1911 च्या उन्हाळ्यात एक ट्रेन रोमन स्टेशनवरून निघून गेली आणि लोम्बार्डमधील एका पर्वतीय बोगद्यातून जाणार होती, परंतु बोगद्यात प्रवेश करताच ती प्रवाशांसह गायब झाली.
106 प्रवाशांपैकी फक्त 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. अपघातापूर्वीच त्याने ट्रेनमधून उडी मारली होती, असे सांगण्यात येत आहे, त्याने ज्या लोकांना ट्रेनमधून बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
मात्र, बचावलेले दोन्ही प्रवासी अपघातानंतर खूप तणावाखाली गेले, पण नंतर ते सावरले. अपघातातून बचावलेल्या दोघांनी सांगितले की, ट्रेन बोगद्यात शिरताच अचानक ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं, लोकांच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसत होती. तर संपूर्ण ट्रेनमध्ये पांढरे धुके पडू लागलं. त्यांनी सांगितलं की, हा धूर बोगद्यात प्रवेश करतानाच दिसत होता.
या घटनेनंतर त्या बोगद्याची अनेकदा पाहणी करण्यात आली. गाड्या, प्रवासी नव्हते आणि भिंतींवर कोणत्या खुणाही नव्हत्या. 3 डबे असलेल्या या ट्रेनचं मॉडेल आजही रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.
1926 मध्ये 1845 मेक्सिकोचा रेकॉर्ड समोर आला नसता तर ही बाब कधीच समोर आली नसती. या रेकॉर्डनुसार, असा दावा करण्यात आला होता की 104 इटालियन मेक्सिकोमध्ये कोठून आले हे कोणालाही माहिती नव्हतं आणि हे लोक स्वत:बद्दल काहीही सांगण्यासही सक्षम नव्हते.
दरम्यान, ही ट्रेन कुठे गायब झाल्याचं आणि ती कशी गायब झाली हे अद्यापही कोडंच आहे. इतकंच नाही तर अनेक देशांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्यांनी अशीच ट्रेन पाहिली होती जी हुबेहूब हरवलेल्या ट्रेनसारखी होती.