शारापोहाचा आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी दिली दाद....

कोर्टवर तिच्या टायमिंग आणि आत्मविश्वासाची जोरदार चर्चा बराच काळ रंगली होती

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 2, 2017, 03:40 PM IST
शारापोहाचा आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी दिली दाद.... title=

नवी दिल्ली :  प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोव्हा भलेही सध्या वादाच्या भोवऱ्यात असेल. पण, तिच्याभोवतीचे वलय तसूभरही कमी झाले नाही. उलट तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढच होत आहे. तिची फॅन फॉलोईंग वाढतच राहते त्याला कारणीभूत असतो तो तिचा आत्मविश्वास अचूक टायमींग साधत मारलेला प्रतिकात्मक फटका. तिच्या आत्मविश्वास आणि टायमिंगचीही नुकतीच प्रचिती आली. तीही टेनिस कोर्टवरच....

झाले असे, शारापोव्हाचा सामना तुर्कस्तानची टेनिसपटू कॅगा बुयुकाकेय  (Cagla Buyukakcay) हिच्यासोबत सुरू होता. कॅगाने या आधी 161 वेळा विश्वविक्रम केला आहे. असा कॅगसोबत टेनिसचा सामना सुरू असाताना मारियाला टेनिस कोर्टवरच लग्नाचा प्रस्तावा आला. झाले असे की, सामना सुरू असताना सेटवर कॅग मारियाविरूद्ध सर्व्हिस करणार होती. तोपर्यंतच तिच्या चाहत्याचा काहीसा ओरडण्याचा आवाज आला. काहीक्षण थांबून तो काय म्हणतोय हे मारियाने आवाजाच्या दिशेने वळून पाहात ऐकले. तर, हा चाहता 'मारिया, तू माझ्याशी लग्न करशील का?' असे विचारत होता. या प्रस्तावाला तिने आपल्या हटके अंदाजात उत्तरही दिले. ते उत्तर पाहून उपस्थितांनीही दाद दिली. पण, त्या चाहत्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र पाहण्यासारखे होते.

मारियाने साधले टायमींग....?

आपल्या चाहत्याचा आवाज आणि प्रश्न कळल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मारियाने आपली मान हालवत चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि म्हणाली 'शक्यता आहे'. मारियाची ही रिअॅक्शन पाहून उपस्थित चाहत्यांमध्ये मात्र भलताच उत्साह संचारला. त्यांनी तिच्या अचूक टायमिंगला जोरदार दाद दिली.

टायमिंग साधत तडाखेबंद खेळी

दरम्यान, त्या चाहत्याच्या वात्रटपणाचा मारियाच्या खेळीवर जराही पहिणाम झाला नाही. उलट हा सामना ती नेहमीप्रमाणेच आत्मविश्वासाने खेळली. तसेच, प्रतिस्पर्धी कॅगाला तिने 6-7, 0-6  अशी टक्कर दिली. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे तिच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळी होती. कोर्टवर तिच्या टायमिंग आणि आत्मविश्वासाची जोरदार चर्चा रंगली होती. महत्त्वाचे असे की, त्यानंतर तब्बल 15 महिन्यांनंतर ती कोर्टमध्ये पुनरागमन करत आहे.