Viral Video : भीतीला ज्यावेळी एखादी व्यक्ती सामोरी जाते तेव्हात ही भीती मागे पडून धाडसी वृत्ती समोर येते, असं अनेकजण म्हणतात. भीती नेमकी कशी दिसते? कशी असते? तुम्हाला माहितीये? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओच्या माध्यमातून ही भीती नेमकी कशी दिसते आणि त्यावर मात करणारी धाडसी वृत्ती कशी असते याचाही चेहरा दाखवला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आहे फेलिक्स बाउमगार्टनर नावाच्या एका लोकप्रिय स्कायडायव्हरचा. ज्यानं 2012 मध्ये चक्क अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं उडी मारली होती. 1 लाख 27 हजार 852 फूट इतक्या उंचीवरून त्यानं ही उडी मारली आणि तिथवर पोहोचण्यासाठी त्यानं हेलियम बलूनचा वापर केला होता.
हेलियम बलूनमध्ये बसून फेलिक्स पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन दुसऱ्या सर्वात खालच्या बाजूला असणाऱ्या थरापर्यंत पोहोतला, जिथं गुरुत्त्वाकर्षण कमी असून, जर तिथून कोणीही पृथ्वीच्या दिशेनं उडी मारली, तर ती व्यक्ती तरंगत नसून थेट पृथ्वीच्याच दिशेनं वेगानं येते. फेलिक्सनं तिथं खास पद्धतीच्या अंतराळवीरांचा सूट परिधान केला आणि तिथून त्यानं पृथ्वीच्या दिशेनं क्षणाचाही विलंब न लावता उडी घेतली.
अवकाशातून उडी मारण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फेलिक्सनं आवाजाच्या गतीला कैक मैल मागे टाकलं आणि तो एका वर्तुळात अडकला. सुरुवातीला ही मोहिमच धोक्यात असलेलं वाटताना अखेर फेलिक्सनं पृथ्वीवर सुरक्षित लँड केलं आणि या मोहिमेकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येकानं सुटकेचा नि:श्वास सोडला. अवकाशातून पृथ्वीवर उडी मारणं हा एक थरारक अनुभव असल्याची प्रतिक्रिया या धाडसी व्यक्तीनं दिली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.