अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार असून येथे लहान मुलांच्या लैंगिक गुलामीवर कथितपणे बऱ्यापैकी अंकुश मिळवला आहे. जर एखादा कमांडर बच्चा-बरीशमध्ये पकडला गेला तर त्याला 20 वर्षांपर्यंत कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. पण यानंतरही ही परंपरा बंद होऊ शकलेली नाही. आजही अनेक लहान मुलं पायात घुंगरु घालून नाचताना आणि लैंगिक शोषणाचा सामना करताना दिसता. यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं प्रामुख्याने समोर येतं. पण त्यांच्या त्या किंकाळ्या अनेक कानापर्यंत पोहोचूनही दुर्लक्षित केल्या जातात.
ओठांवर लिप्स्टिक, डोळ्यात काजळ, पायात घुंगरु घालून रोज ही मुलं भारदस्त मेकअप करुन आपंल नृत्य सादर करत असतात. पण जेव्हा वय वाढतं तेव्हा मालक त्यांच्या जागी कमी वयाच्या मुलांना आणतात. पण फक्त या एकमेव कामाची सवय झालेल्या मुलांना जे आता पुरुष झालेले असतात त्यांच्याकडे इतर कौशल्य नसल्याने बेरोजगार होण्याची वेळ येते. इतकी वर्षं बच्चा-बरीश राहिल्याने चांगलं अन्न खाण्याची सवय लागलेली असते. पण आता हे सर्व अचानक गायब होऊन समोर फक्त अंधार दिसू लागतो.
'आज तक'ने अशाच एक पीडित मुलाशी संवाद साधला जो कित्येक वर्षं घरापासून दूर होता. आता जेव्हा तो घरी परतला तेव्हा चेहरा वगळता सर्व काही बदललं होतं. अफीम शेतात काम करत असताना त्याला काही जण उचलून घेऊन गेले होते, शुद्ध आली तेव्हा ते एका नव्या छताखाली होती. नवं नाव आणि नवी ओळख त्याच्या वाट्याला आली होती. तो जुनैदपासून गुल झाला होता, जो मुलींप्रमाणे सजून लोकांमध्ये नाचत होता.
जसंजसं महिने उलटत राहिले तसतसं त्याच्यात कौशल्य येत गेलं. चेहऱ्यावर जितक्या कमी सुरकुत्या, कंबर जितकी बारीक आणि लचकदार तितका मालिक जास्त मेहरबान होत असे. पण याबदल्यात त्याला वाटेल तेव्हा बलात्कार सहन करायचा आणि हवं तेव्हा नाचायचं. नाचण्यासाठी काही खास प्रशिक्षणाची गरज लागत नाही. गाणं सुरु झाल्यावर त्याच्यावर कंबर हलवत नाचायचं. यावेळी आजुबाजूला बसलेले गप्पा किंवा एखाद्या व्यवसायावर चर्चा करत असतात.
नाचताना जर एखाद्याने पैसे दिले तर हे हाताने घ्यायचे नाहीत. तसं केल्यास तो अपमान समजला जातो. पैसे दातानेच उचलायचे अशी पद्धतच आहे. एकदा मी असं केलं तर मालकाने बलात्कार करण्याआधी मला खूप मारहाण केली असं तो सांगतो. बलात्कार फक्त मालकच करणार असं काही, त्याचे मित्रही करतात. पण मारहाण करताना चेहऱ्यावर कुठे जखम होणार नाही याची काळजी घेतली जाते.
कमांडर्स गरीब घऱातील मुलांवर नजर ठेवतात. यासाठी ते 10 ते 18 वर्षांच्या मुलांना टार्गेट करतात. अशी मुलं मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाशी सौदा केला जातो. किंवा त्यांचं अपहरण केलं जातं. यानंतर ते अनेक वर्षं एका मालकाकडे असतात. एकमेकांकडे सोपवलं जाण्याची शक्यता कमी असते.
यामध्ये कोणाचा मुलगा जास्त नाजूक आणि अदा दाखवणारा आहे याची स्पर्धाच असते. आपली ताकद, पैसा, शस्त्रं दाखवण्यासारखंच हे आहे. धर्मानुसार येथे मुलींना नाचवू शकत नाही यामुळे त्यांची जागा बच्चा-बऱीशने घेतली. या मुलांना आपली पत्नी, प्रेयसी आणि संपत्तीप्रमाणे ठेवलं जातं.
हा पर्शियन भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ बॉय प्ले आहे. या प्रथेनुसार, 9 वर्षांवरील आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लैंगिक गुलाम म्हणून ठेवले जाते. ह्यांना बच्चा-बरीश म्हणतात, म्हणजे ज्यांनी दाढी वाढलेली नाही. कधीकधी त्यांना प्रेम दाखवण्यासाठी आशना देखील म्हणतात. त्यांच्या लहान वयामुळे, त्यांच्यामध्ये अनेक स्त्रीलिंगी गुण आहेत, ज्यामुळे त्यांना मुलींच्या बदली म्हणून पाहिले जाते.
लैंगिक शोषणामुळे या ट्रेंडमध्ये अडकलेली मुले अनेक आजारांना बळी पडतात. कमांडरच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानला लागून असलेल्या दक्षिण भागात ही परंपरा अधिक प्रचलित आहे, त्यामुळे अशी प्रकरणे तिथल्या डॉक्टरांकडे जास्त येतात. मात्र हे गुपित बाहेर येऊ नये म्हणून कुटुंबीय आणि डॉक्टर स्वत: कमालीची गुप्तता पाळतात. अनेकवेळा कुटुंबीय भीतीपोटी अर्धवट उपचार घेतात.
यातील सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की जेव्हा मुले अनेक वर्षांनी परत येतात तेव्हा ते सामान्य राहू शकत नाहीत. ते वेगवेगळ्या सवयी असलेले प्रौढ आहेत. अनेकवेळा स्वत: कुटुंबही त्यांना दत्तक घेण्यास कचरतात. जरी त्यांचे लग्न झाले तरी ते नातेसंबंधात सहज राहू शकत नाहीत आणि ते स्वतःच अल्पवयीन मुलांची शिकार करू लागतात. हा क्रम असाच चालू राहतो.
अफगाणिस्तानमध्ये, 2018 मध्ये सुधारित दंड संहितेत यासाठी कठोर शिक्षा लागू करण्यात आली आहे. याशिवाय बाल संरक्षण कायद्याच्या कलम 99 अन्वयेही हे बेकायदेशीर आहे. तालिबानच्या आगमनानंतर आणखी कठोर शिक्षेचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये 20 वर्षे तुरुंगवास किंवा मृत्यूदंड आहे.