दयाशंकर मिश्र : भय्यूजी महाराज एक 'मॉडेल' संत होते, माझी देखील त्यांच्याशी भेट झालीय. भोपाळमध्ये आमचे न्यूज पेपरचे एमडी यांच्याकडे ते आले होते. सर्वांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. भय्यू महाराजांचा पाया पडण्यासाठी तेव्हा रांग लागली होती. असं म्हणतात की भय्यू महाराज हे आधी फॅशन डिझायनर होते, मॉडेल होते. मॉडेलिंगनंतर ते आध्यात्माचे हिरो झाले. राजकीय लोकांमध्ये खूप आत्मविश्वास असतो, असं वाटतं, पण तेवढा त्यांच्यात नसतो, जेवढा ते दाखवतात. असे लोक आध्यात्म गुरूच्या शोधात असतात.
भय्यूजी महाराजही अशा सेलिब्रिटींसाठी 'संत' होते. ते सर्वसामान्य लोकांच्या 'क्लास'पेक्षा, 'क्रीम क्लास'मध्येच जास्त लोकप्रिय झाले, तेव्हा जनतेत त्यांची ओळख झाली. काहीही झालं तरी भय्यूजी महाराज यांचा भक्तगण हा 'ग्लॅमरस' लोकांचाच जास्त होता. यात धनिक, प्रतिष्ठीत लोकांचा विश्वास त्यांनी जिंकला होता. भय्यूजी यांच्या 'रेंज'मध्ये लोकप्रिय लोक असले, तरी भय्यूजींसोबत असणे सुद्धा, एक 'ग्लॅमर' होतं.
जे भय्यूजी महाराज सर्वांना सुखाचा आनंदाचा रस्ता दाखवत होते, आणि त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट असा केला, तेव्हा ही आश्चर्यात टाकण्याचीच बाब नाही, तर चिंतेचीच बाब जास्त आहे. 'डिअर जिंदगी'च्या मागील अनेक लेखांमध्ये आपण यावर सतत बोलत आहोत की, भारतात आणि अमेरिकेत अशा लोकांमध्ये आत्महत्या वाढत आहेत. ज्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत, आणि ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाहीत, असे दोन प्रकारचे बहुतांश लोक, आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.
भय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटमधील शेवटचे शब्द नीट समजून घ्या, भय्यू महाराजांनी म्हटलं आहे, 'मी जातोय, मी थकलोय, मी निराश आहे'. अशा व्यक्तींकडे जीवन जगण्याची शंभर कारणं आहेत, आणि आत्महत्या केवळ एकमेव. जर जीवन सुंदर करण्याची शंभर कारणं सोडून, जीवन संपवण्याचं एक कारण निवडलं जात असेल, तर समाजाला तेथे थांबण्याची गरज नाही. कारण आपण जीवन जगण्याची जी कारणं निवडली आहेत, मुळातच, निश्चितच त्याच्यात काहीतरी दोष आहे. यामुळेच अनेक चांगल्या कारणांना सोडून एक सेलिब्रिटी जीवनाच्या संघर्षाला सोडून जात आहे.
दुसऱ्याचं सांत्वन करता-करता अनेक वेळा आपल्यासाठी अश्रू कमी पडतात. जगभरात सेलिब्रिटींसोबत असंच काहीसं होतंय. अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर केट स्पॅड आणि लोकप्रिय शेफ, फूड क्रिटिक आणि लेखक एंथनी बॉरडॅन यांच्या आत्महत्येची बातमी देखील असंच काहीसं सांगतेय. आनंद, मौज आणि आपल्याच जगात रममाण राहणे, या सर्वसामान्य गोष्टींमध्ये खरं सुख आहे. मात्र जगातले बहुतांश लोक, या साध्या गोष्टी शोधत फिरतायत.
'सर्व काही ठिक होईल, ही वेळ सुद्धा निघून जाईल', हा विचार, भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग होताच. म्हणूनच की काय, तेव्हा भारतात एवढ्या प्रमाणात आत्महत्या होत नव्हत्या. तेव्हा जीवन खरंतर कठीण होतं. आता 'जीवन' सोपं झालं आहे, तर आपलं 'जगण' मात्र कठीण. कारण आपण जीवनाचा मूळमंत्र 'सर्व काही ठिक होईल, ही वेळ सुद्धा निघून जाईल', ही साधीसुधी जगण्याची, विचार करण्याची पद्धत विसरत चाललो आहोत.
जीवनात स्वप्नाचं वेड लावून घेणं चुकीचं नाहीय. महत्वाकांक्षा वाईट शब्द नाहीय, तोपर्यंत, जोपर्यंत त्यांची लगाम आपण हातातून सुटू देत नाहीत. जेव्हा ही लगाम, तुमच्या हातातून सुटेल. जीवन आपला अर्थ सोडून चुकीच्या मागावर निघून जाईल.
भय्यूजी जे नात्यांची शिकवण जगाला देत होते. ते यापूर्वीच आपल्याच शब्दांचे अर्थ हरवून बसले होते. त्यांच्यासमोरील अडचणींमुळे ते तणावात असावेत. जेव्हा कधी आपण, मानव आणि मानवता यांना दुर्लक्षित करतो, आणि स्वप्नांच्या मागे धावतो, तेव्हा आपलं जीवन अशा ठिकाणी बुडण्याचा धोका असतो. अशा डोहात अनेक पट्टीचे पोहणारे, कधीच पाण्याच्यावर डोकं काढू शकलेले नाहीत.
यामुळे कुणाच्या मागे वेडे होवू नका. कुणाचे डोळे लावून फॅन होवू नका, आणि तेव्हाही मन ऐकत नसेल, तर फक्त आपल्या परिवाराचे फॅन व्हा. त्या मित्रांमध्ये जीवनाचा अर्थ शोधा, ज्यांना तुमची साथ हवी आहे. मात्र दुसरीकडे असं होतंय की, तुम्ही काहीही कारण नसताना अशा लोकांकडे अपेक्षा शोधत आहात, ज्याच्यांकडे चारित्र्य, नात्यात काळजी आणि इमानदारीची भावना नाही.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)