Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात रविवार 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy 2025) हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाच लक्ष असून या अटीतटीच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. उद्या दुबईत होणारा सामना हा भारत - पाक या दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार असून यात पाकिस्तानचा पराभव झाल्यास ते चॅम्पियन्स ट्रॉफीतून थेट बाहेर पडतील. तर भारताचा विजय झाल्यास ते सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करतील. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंतच्या इतिहासात भारत - पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे याबाबत जाणून घेऊयात.
19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 4 सामने पूर्ण झाले असून रविवारी पाचवा सामना भारत - पाकिस्तान यांच्यात होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हे पाकिस्तानकडे असून येथील महत्वाच्या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होत आहेत. तर भारत दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने खेळेल. भारत - पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार असून दुबई 2: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांचा हा यंदाच्या स्पर्धेतील दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून तब्बल 60 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा : भारत-पाक मॅचदरम्यान मैदानात 5 वेळा झालाय तुफान राडा! पार हाणामारीवर उतरलेले खेळाडू
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत भारत - पाकिस्तान हे दोन संघ ५ वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी ३ वेळा भारताने तर २ वेळा पाकिस्तानने विजय मिळवलाय. 19 सप्टेंबर 2004 रोजी झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने पाकिस्तानचा विजय झाला होता. तर 26 सप्टेंबर 2009 रोजी झालेल्या सामन्यात 54 धावांनी पाकने भारतावर विजय मिळवला होता. तर 2017 रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सुद्धा पाकिस्तानने भारतावर विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. तर भारताने 15 जून 2013 रोजी पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. तर १४ जून रोजी झालेल्या सामन्यात भारताने 124 धावांनी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता.
भारत पाकिस्तान यांच्यात झालेलं सामने : 135
भारताने जिंकलेले सामने : 57
पाकिस्तानने जिंकलेले सामने : 73
अनिर्णित राहिलेले सामने : 5
हेही वाचा : Mumbai Indians कडून खेळणार बॉलिवूड स्टारचा मुलगा! 4 शतकं ठोकून मिळवली जागा
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर.
नॉन-ट्रॅवलिंग सब्स्टीट्यूट: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे