Sourav Ganguly: क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर तर क्रिकेटचा महाराजा म्हणून टीम इंडियाचा सौरव गांगुली प्रसिद्ध आहे. क्रिकेट जगताला आपल्या बॅटची ताकद दाखवून देणाऱ्या सौरव गांगुलीची कहाणी लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा महाराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचा बायोपिक बनवला जात आहे. ऑन-स्क्रीन सौरव गांगुली कोण असणार याबद्दल खूप चर्चा होत होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी मोठ्या पडद्यावरील बॉलिवूड अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. खुद्द दादानेच याची घोषणा केली आहे.
दादा सौरव गांगुलीच्या बायोपिकची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. आता अखेर या दिग्गज क्रिकेटपटूने स्वत: त्याच्या बायोपिकला मंजुरी दिली आहे आणि या चित्रपटात कोणता नायक घेणार हे देखील उघड केले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा राजकुमार अर्थात राजकुमार राव आहे.
हे ही वाचा: शिखर धवनसोबतची 'ही' मिस्ट्री गर्ल कोण होती? नेटिझन्स शोधत असलेली प्रोफाइल सापडली
मोठ्या पडद्यावर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरभ गांगुली म्हणाला, "मी जे ऐकले आहे त्यानुसार, राजकुमार राव मुख्य भूमिका साकारणार आहे, परंतु त्याच्या तारखेचा मुद्दा आहे. त्यामुळे हा सिनेमा पडद्यावर येण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागेल."
हे ही वाचा: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
सौरव गांगुली क्रिकेट विश्वात दादा या नावाने प्रसिद्ध आहे. या क्रिकेटच्या महाराजाने क्रिकेट विश्वात एक वेगळी छाप सोडली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 113 कसोटी सामने आणि 311 OD सामने खेळले आहेत. तो बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आतापर्यंतचे सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे.
स्त्री 2 च्या यशाचा आनंद घेत असलेल्या राजकुमार रावकडे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करण्याव्यतिरिक्त, तो काही चित्रपटांमध्ये कॉमेडीचा टच देखील जोडताना दिसणार आहे. अलीकडेच त्याच्या आगामी 'भूल चुक माफ' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.