दयाशंकर मिश्र : डिअर जिंदलीला देशभरातून वाचकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळतंय. आम्हाला प्रत्येक दिवशी एक अनुभव, प्रतिक्रिया मिळत आहेत. जेवढं शक्य असेल, आम्ही या संवादावर बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला असाच एक अनुभव अहमदाबादच्या अनामिका शाह यांचा मिळाला आहे. अनामिका लिहीते की, मला ३ वयोवृद्धांचं प्रेम मिळालं आहे. यात आजी, आजोबा आणि शिक्षिकेचा समावेश आहे. तीनही जणांचं वय पंच्याहत्तरीच्या पुढे आहे. ते सर्व सुखी आणि आनंदी आहेत. यांचं आरोग्य देखील खूप चांगलं आहे. कुणालाही बीपीचा त्रास नाही. डायबेटीज नाही, तणाव नाही, चिंता नाही.
अनामिका लिहिते, यांच्यात माझ्या परिवारात याशिवाय आणखी कुणीच असं नाही. खुद्द तिचे वडील, मामा आणि दुसरे नातेवाईक, हे मात्र अशा तणावाचा सामान करताना दिसतात. ज्यावर दुसऱ्या दिवशी हसण्याशिवाय काहीही करता येऊ शकत नाही. प्रत्येक दिवशी चिंतेत बुडताना ते दिसतात. म्हणून प्रत्येकाच्या बोलण्यात आज नाही उद्या, उद्या नाही परवा, अशी स्वप्न पडत असतात. तर आपली वयोवृद्ध मंडळी हेच सांगत असते की, ‘पूत कपूत तो क्यों धन संचय और पूत सपूत तो क्यों धन संचय'!
आता थोडं थांबून अनामिकाच्या वयोवृद्ध मंडळीच्या जीवनातील आनंदाला, त्यांच्या चांगल्या परिणामाला समजण्याचा प्रयत्न करू या. हे तीनही वयोवृद्ध सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिवारातून आहेत. त्यांना देखील त्यावेळी तेवढीच चिंता असेल, जेवढी आपल्याला आज आहे. आजकाल लोक म्हणतात, जीवन पहिल्यासारखं सोपं नाहीय, आता मोठी स्पर्धा आहे. काहीही मिळवणं, एवढं सोपं राहिलेलं नाही. पण ही एक फसवणूक आहे, भ्रम आहे, स्वत:ला सत्यापासून दूर नेण्याचा हा प्रयत्न आहे.
वेळ एकसारखीच असते. पहिल्यासारखं काही सोपं किंवा कठीण असं काही नाही. कारण तेव्हाची ग्वाही द्यायला आजचं कुणीही नाही. आजची ग्वाही द्यायला उद्या तुम्ही नसाल. जेव्हा तुम्ही नसाल तेव्हाचे लोक म्हणतील, अरे आज जीवन जगणं किती कठीण झालं आहे. या आधीचं जग फार बरं होतं.
जीवन जगत असताना, तुमच्या जीवनाविषयीचा दृष्टीकोन सर्वकाही आहे, महत्वाचा आहे. म्हणून दृष्टीकोन सकारात्मक करा, सांभाळा, पहिल्या टप्प्यात जीवन सोपं होत नाही. आधी सुविधा कमी होत्या, संघर्ष अधिक होता. तरी देखील आपलं आरोग्य, जीवनातील ताण-तणाव कमी होते. म्हणजे, औषध नव्हतं, तर दुखणंही नव्हतं. औषध घरात आलं आणि सोबत दुखणंही आलं.
आपल्याला वयोवृद्धांकडून शिकण्याची, समजून घेण्याची गरज आहे. ते कशाप्रकारे आपल्या कठीण काळाचा सामना करीत आहेत. जेव्हा कोणताही पर्यायसमोर दिसत नव्हता, तरी देखील ते कसे निर्णय घेत होते. कसे ते तणाव आणि नात्यांतल्या गुंतागुंतीचा सामना करत होते. कमी बजेटमध्ये आपल्या गरजा पूर्ण होत होते. कसे ते इच्छा, गरज आणि लालसा यामधील अंतर समजून घेत होते.
हे सर्व यासाठी देखील समजून घेणं गरजेचं आहे. कारण, आपण पैसे कसे कमवायचे हे शिकलो, पण जीवन जगण्याची पद्धत विसरत चाललो आहोत. यासाठी आपण आनंदाची स्वप्न विनण्याच्या गोंधळात, आपण असे काही गुंतत गेलो की, जीवनाला फुलवण्याआधीच वाळवंट बनवून टाकलं.
आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर स्वत:च्या खूप जवळ जावं लागेल. यामुळे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजणार आहे.
ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com
पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)