फोटोत रडत असलेल्या मुलाला ओळखंत? याने बॉलिवूड अभिनेत्रींना प्रेमात रडवलंय !

सध्या हा अभिनेता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हसीनाला डेट करत आहे. 

Updated: Mar 11, 2022, 03:57 PM IST
 फोटोत रडत असलेल्या मुलाला ओळखंत? याने बॉलिवूड अभिनेत्रींना प्रेमात रडवलंय ! title=

मुंबई : फोटोत रडताना दिसणारा हा मुलगा आज बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार आहे. केवळ या मुलाची बहीण वगळता त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला बॉलिवूडमध्ये विशेष स्थान आहे.

सध्या हा अभिनेता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हसीनाला डेट करत आहे. तसेच याआधीही त्याचे नाव दोन बड्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

त्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत असतात. या स्टारचं अद्याप सोशल मीडियावर अकाऊंट नाही.

त्यात आता सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचे बालपणीचे फोटोही चाहत्यांचं लक्षवेधून घेत आहेत.

लहानपणीचे कलाकारांचे फोटो ओळखणं अनेकांना कठीण झालं आहे. काहींनी या अभिनेत्याला ओळखलं आहे. तर काहींना अद्याप हा स्टार कोण असा प्रश्न पडला आहे. फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आहे. रणबीरला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. 

रणबीर कपूरचे नाव बॉलिवूडमधील अनेक टॉप अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. रणबीरने करिअरच्या सुरुवातीला दीपिकाला डेट केले होते, तर दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना त्याच्या आयुष्यात आली.

पण बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे नाते तुटले आणि काही वर्षांनी कतरिना कैफची बेस्ट फ्रेंड आलिया भट्टने रणबीर कपूरच्या आयुष्यात एन्ट्री केली. रणबीर कपूर सध्या आलिया भट्टला डेट करत असून दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.