अभिनेत्री रवीना टंडनवर कारवाई होणार? दिले चौकशीचे आदेश

अभिनेत्री Raveena Tandon च्या अडचणीत वाढ, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होणार

Updated: Nov 29, 2022, 09:15 PM IST
अभिनेत्री रवीना टंडनवर कारवाई होणार? दिले चौकशीचे आदेश title=

Raveena Tandon News : अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हे बॉलिवूडमधलं (Bollywood) एक प्रसिद्ध नाव. रंवीना टंडन हिने अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movie) दिले आहेत. 90 च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने रवीना टंडन हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं होतं. बॉलवूडमध्ये 'मस्त मस्त गर्ल' म्हणून ओळखली जाणारी रविना टंडन आज वयाच्या 47 वर्षीही तितकीच ग्लॅमरस दिसते. रवीना टंडनला अभिनयाबरोबरच वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचाही (Wildlife Photography) छंद आहे.

रवीना टंडनवर का होणार कारवाई?
वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या छंदासाठी रवीना टंडन देशातील विविध जंगल आणि अभयारण्यात जात असते. प्राण्यांचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) ती आपल्या सोशल मीडियावर  (Social Media) शेअरही करते. काही दिवसांपूर्वी रवीना टंडन हिने मध्यप्रदेशामधल्या सतपुडा टायगर रिझर्व्हला (Satpura Tiger Reserve) भेट दिली. इथं तीने जंगल सफारीचा आनंद लुटला.

जंगल सफारीत रवीना टंडन हिने वाघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. पण यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. रवीना टंडन हिने वाघांचे अगदी जवळून फोटो काढले. असं करणं नियमांविरोधात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सतपुडा टायगर रिझर्व्ह व्यवस्थापनाने रवीना टंडनविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. रवीन टंडन हिने 25 नोव्हेंबरला जंगल सफारीचा (Jungle Safari) एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत रवीना टंडन ज्या जिप्सी गाडीत होती ती वाघाच्या अगदी जवळ होती.

वाघाच्या इतक्या जवळ गेल्यामुळे तिच्या जीवालाही धोका उद्भवू शकत होता. सतपुडा टायगर रिझर्व्हच्या नियमांनुसार जंगल सफारीदरम्यान वन्य प्राणी आणि जिप्सीत कमीत कमी 20 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. या नियमांचं रवीना टंडनकडून पालन करण्यात आलं नाही. त्यामुळेच  सतपुडा टायगर रिझर्व्ह व्यवस्थापनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यात रवीना टंडन दोषी आढळली तर तिच्यालर योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे.