अनिल कपूर यांचा फिटनेस फंडा; नीना गुप्ता आणि शिल्पा शेट्टी म्हणाल्या..

बॉलिवूडचा प्रत्येक कलाकार अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. त्यामध्ये अभिनेते  अनिल कपूर देखील सामील आहेत. 

Updated: May 24, 2021, 04:37 PM IST
अनिल कपूर यांचा फिटनेस फंडा; नीना गुप्ता आणि शिल्पा शेट्टी म्हणाल्या.. title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रत्येक कलाकार अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. त्यामध्ये अभिनेते  अनिल कपूर देखील सामील आहेत. अनिल त्यांच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतात पण आता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांचे बायसेप्स सर्वांना घायाळ करत आहेत. मुलगी सोनम कपूरच्या लग्नातही अनिल कपूर यांच्या फिटनेसची बरीच चर्चा झाली होती. अनिल कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नवी फिटनेस पोस्ट शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

फिटनेस पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'लॉकडाउन हे अनिवार्य आहे, पण यात तुम्ही काय करता हे पर्यायी आहे…' असं लिहिलं. फोटोमधील त्यांचे बायसेप्स प्रत्येकाला थक्क करणारे आहेत. वयाच्या 64व्या वर्षी देखील ते अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत. अनिल कपूर यांनी गेल्या काही वर्षात आपल्या फिटनेसवर बरेच काम केले आहे. 

अनिल कपूर यांच्या फिटनेसवर फक्त त्यांचे चाहते इम्प्रेस झाले नसून बॉलिवूडकरांनी देखील त्यांचा फोटोवर लाईक आणि कमेन्ट्सचा पऊस पाडला आहे.  अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील कमेंट करत ‘तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात’ तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील अनिल कपूर यांच्या फिटनेसचं कौतूक केलं.