मुंबई : रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनचपसंती दर्शवली. घरातीलबापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला. सध्या मालिकेतप्रेक्षक आबा साहेबांच्या सत्तेसाठी चाललेली चढाओढ आणि निशावर सगळ्यांचा संशय असल्याचं पाहत आहेत.
पळून जाऊन लग्न करण्यासाठी मदत मागायला आलेली मुलं अचानक गायब होतात आणि त्यांना शोधायची जबाबदारी सूर्या घेतो. आईसाहेब त्या मुलांना शोधून काढायची मुदत सूर्याला देतात आणि ती मुदत संपत आलेली असतानानिशा आईसाहेबांना सूर्या आबासाहेबांच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी कसा योग्य नाहीये हे पटवून द्यायला लागते. त्या खुर्चीवर बसायचा मान तिला मिळावा असं ती त्यांना सांगते पण इतक्यात सूर्या तिकडे हरवलेल्या त्यामुलांसोबत येतो आणि त्यांच्या पालकांकडे त्यांना सुपूर्त करतो.
या मुलांच्या गायब होण्यामागे नक्कीच निशाचा हात होता अशी शंका सूर्याला येते आणि काही गोष्टींमुळे त्याची शंका सत्यात उतरते. निशाचा खरा चेहरा सूर्या समोर येतोआणि निशा हे सर्व सत्तेसाठी आणि बाबासाहेबांची खुर्ची बळकावण्यासाठी करत असल्याची कबुली देते. आबासाहेंबाच्या खुर्चीवर निशा बसणार कि सूर्या? निशाचा खरा चेहरा सूर्या सगळ्यांसमोर आणणार का? हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळेल.