Kattappa Daughter Divya Sathyaraj: 'बाहुबली' (Bahubali) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. अभिनेता प्रभास याची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकारानं आपली वेगळी छाप सोडली. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेते सत्यराज.
'कटप्पा' ही व्यक्तीरेखा साराकत सत्यराज यांनीही प्रेक्षकांना अवाक् केलं. याच सत्यराज यांचं नाव आता त्यांच्या मुलीमुळं चर्चेत आलं आहे. कोणा एका अभिनेत्रीप्रमाणंच सत्यराज यांची मुलगी प्रचंड रुपवान आहे.
चित्रपटांच्या विश्वापासून सत्यराज यांची लेक दूर असली, तरीही तिच्याकडे पाहता ती भल्याभल्या अभिनेत्रींना अगदी सहज टक्कर देईल, असंच अनेकजण म्हणतात.
सत्यराज यांच्या मुलीचं नाव, दिव्या सत्यराज असं आहे. प्रत्यक्ष आयुष्यात दिव्या सामाजिक कार्यांमध्ये हातभार लावते. फक्त भारतातच नाही, तर परदेशातही दिव्या तिच्या कामामुळं ओळखली जाते.
दिव्या न्यूट्रीशनिस्ट म्हणूनही काम करते. एका स्वयंसेवी संस्थेशीही ती जोडली गेली आहे. गरजवंतांना काम करण्यासाठी ती कायम पुढाकार घेताना दिसते. बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत दिव्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिलं होतं. या पत्राची त्यांच्याकडून दखल घेण्यात आली होती.
कलाजगतापासून दूर असली तरीही दिव्या सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रिय आहे. ज्यामुळं तिच्या आणि अर्थातच कटप्पा सत्यराज यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय याचा सहज अंदाज लावता येतो.