बांगलादेशी हिरोने शाहरुखसोबत पोस्ट केली सेल्फी, शाहरूख माझा फॅन

 बांगलादेशचा सुपरस्टार अलोम बोगराबद्दल तुम्हांला माहिती असेलच. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्यक्ती चर्चेत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 26, 2017, 08:55 PM IST
बांगलादेशी हिरोने शाहरुखसोबत पोस्ट केली सेल्फी, शाहरूख माझा फॅन  title=

नवी दिल्ली :  बांगलादेशचा सुपरस्टार अलोम बोगराबद्दल तुम्हांला माहिती असेलच. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्यक्ती चर्चेत आहे. 

सुंदर तरुणींसोबत फोटोमध्ये दिसणारा हा अलोम त्याच्या भेसूरपणामुळे मस्करीचा विषय बनला आहे. अलोमने नुकतेच आपल्या ट्विटरवर बॉलिवूड सुपस्टार शाहरूख खानसोबत एक सेल्फी टाकला आहे आणि शाहरूख खान माझा फॅन असल्याचे म्हटले आहे. 

 

या  फोटो कॅप्शनमध्ये अलोमने लिहिले आहे की सारूख खान मेरा फैन है... १०० परसेंट हिरो अलोम बोगरा... सुनो सारुख मेरे साथ सेल्फी ले रहा है... लव यू सारूख माय फैन... विशेष म्हणजे शाहरुखच्या नावाचे स्पेलिंग पण त्याने चुकवले आहे. 

सध्या शाहरूख खानसोबत त्याचा सेल्फी पाहून सर्व हैराण आहेत. इतकेच नाही सेल्फीनंतर लोकांनी त्याची मस्करी करणे पुन्हा सुरू केले आहे. 

सेल्फीचं सत्य 

या सेल्फीचं सत्य आम्ही तुम्हांला सांगणार आहे. शाहरुख सोबत अलोमने काढलेला सेल्फी खरा नाही. यात त्याने फोटोशॉपचा वापर करून आपला चेहरा टाकला आहे. शाहरूखने एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या चाहत्यासोबत फोटो काढला होता. 

दुसरे म्हणजे अलोम बोगराच्या ज्या ट्विटर अकाउंटवर फोटो पोस्ट करण्यात आला. त्याला केवळ ३५०० हजार फॉलोवर्स आहेत.  अलोम बांगलादेशमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बांगलादेशचे क्रिकेटरनी त्याच्यासोबत फोटो काढले आहेत. अलोम आतापर्यंत ५०० गाण्यात दिसला आहे.