मराठीमधील सर्वात बेस्ट चित्रपट कुठला तर असंख्य लोक सैराट या चित्रपटाचं नाव घेतात. हा चित्रपट आजही घरोघरी पाहिला जातो. या चित्रपटात आंतरजातीय प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्याचा शेवट कसा होतो, हे दाखवण्यात आलंय. भारतातील गावांमध्ये आजही सैराट सारख्या भयानक घटना पाहिला मिळतात. या चित्रपटातील शेवटचा सीन पाहिला अंगावर काटा तर येतो, पण क्रूरतेचा भयावह चित्र डोळासमोर उभं राहत. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचा शेवटी त्या लहान बाळाला रक्ताने माखलेल्या पायाने रडताना घराबाहेर पडताना दाखवलंय. या लहान बाळा नेमकं आपल्याला काय करायचं आहे, हे सांगणे कठीण होतं. ते बाळ आईशिवाय कुणाशीही संवाद साधू शकत नव्हतं. मग नागराज मंजुळे यांनी हा सीन कसा शूट केला तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना.
या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी तो लहान मुलगा आपल्या आईवडिलांसोबत कलाकारांसोबत एकत्र राहिले होते. कारण त्या बाळाची इतर कलाकारांशी ओळख व्हावी. आईशिवाय हे बाळ कोणाचं काही बोलण समजू शकत नव्हतं. त्यामुळे हा शेवटचा सीन करणे त्या बाळासोबत कठीण होतं असं खुद्द मंजुळे यांनी सांगितलं.
नागराज मंजुळे सांगतात की, सुरुवातीला हे दृश्य पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. या चित्रपटातील शेवटचा सीन तुम्हाला आठवत असेल तर असा होता की, एक लहान बाळ चालत घरात जात असतं. घरात आई बाबांसोबत काय झालं याची त्याला कल्पना नसते. पण तो रडणार...पण त्याला रडवायचं कसं हा प्रश्न होता. त्यामुळे मंजुळे म्हणाले मला एक कल्पना सुचली. त्यांनी या बाळाच्या आईलाच शेजारीण म्हणून चित्रपटात दाखवायचं ठरवलं. त्यामुळे या बाळासोबत सीन करणे सोपे झालं.
आता या मुलाला रडवण्यासाठी काय करायचं, तर त्याबद्दलही एक कल्पना सुचली. त्या बाळाला गाड्यांची आवड होती खूप...मग काय सेटवर एक रिमोट कंट्रोल गाडी आणली गेली. या गाडीद्वारे त्या मुलाला नियंत्रण ठेवलं गेलं. नागराज स्वतः गाडीला रिमोटने चालवायचे आणि मुलाला त्याच्या दिशेने घेऊन यायचे. ज्यावेळी मुलाला रडवायचे होते, तेव्हा नागराज यांनी गाडी उलट फिरवून मुलाला शेजारणीकडे परत पाठवले. या चित्रीकरणाच्या दरम्यान, गाडीला दूर पळवण्याचे काम त्यांनी केले आणि एकाच प्रयत्नात या महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
'सैराट'च्या शेवटच्या सीनमधील लहान मुलगा रक्ताने माखलेले पाय घेऊन घराबाहेर पडतो, हे दृश्य इतके वास्तविक वाटतं तेवढं ते मनाला हेलावून टाकणारं होतं. रक्ताचे ठसे दाखवताना, नागराज मंजुळे यांना खून कसा झाला हे दाखवायची गरज नव्हती, कारण त्या ठशांनाच त्या क्रूरतेचे आणि गुन्ह्याचे प्रतीक बनवण्यात आलं होतं. या दृश्याने प्रेक्षकांना सुन्न करुन सोडलं. चित्रपटगृहाबाहेर पडताना संताप आणि अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण करण्यात मंजुळे यांना यश आलं.