शिवरायांच्या नावावरुन ठेवा बाळाचं नाव; चेक करा सुंदर नावांची यादी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच आराध्य दैवत. त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 18, 2025, 02:10 PM IST
शिवरायांच्या नावावरुन ठेवा बाळाचं नाव; चेक करा सुंदर नावांची यादी title=

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात एक प्रमुख सरदार होते, ते एक पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक होते. त्यांच्या या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर होता. शिवाजी महाराजांच्या आधी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी सुद्धा केला होता. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेलं धैर्य, नेतृत्व आणि युद्धकौशल्य शिकवलं.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने महाराजांना आपल्या जीवनात आदर्शस्थानी मानले पाहिजे. शिवरायांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर खालील पर्याय हा सर्वोत्तम ठरु शकतो. या नावांवरुन मुलांच्या जीवनात छत्रपती शिवरायांचे गुण त्यांच्या जीवनात अंगिकारले जातील. 

(हे पण वाचा - छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? पाहा भोसले घराण्याचा इतिहास) 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन मुलांची नावे 

शिवार्थ 
राजशिव
वीरशिव
शिवराज
शिवांग
राजमुद्रा
राजेश
शिवाजी

शिवरायांच्या नावावरुन मुलींची नावे 

हिंदवी
शिवश्री
शिवाज्ञा
शिवजा
शिवबा
छत्रपती
राजाराम
अंबादास
वीर

(हे पण वाचा - Bank Holiday : बुधवारी शिवजयंतीनिमित्त शाळा आणि बँका बंद असणार का?) 

महाराजांच्या नावावरुन आणखी नावे 

प्रताप
साहस 
शंभू
स्वराज
शिवांश
शिव
शिवांक
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवंकर
शिवानंद
शिवजित
शिवाक्ष
शिवराज
शिवजित
शिवशंभू