Serial Killer Raja Kolandar: गुन्हेगारीच्या विश्वात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळं अंगावर शहारा येईल. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आत्तापर्यंत देशभरात घडल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे राजा कोलंदर. या नराधमाचे कृत्य देशाला हादरवून टाकणारे ठरले आहे. अलीकडेच या घटनेवर नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री प्रसारित झाली आहे.
प्रयागराजच्या सिरीयल किलर म्हणजेच असा मनोरुग्ण ज्याने एका मागोमाग एक हत्या घडवल्या. त्याची हत्या करण्याची पद्धतदेखील खूपच क्रूर आणि दहशत निर्माण करणारी होती. 14 लोकांची हत्या कपुन त्यांच्या मेंदूचं सूप करुन पिणाऱ्या या हैवानाचे नाव राजा राम निरंजन उर्फ कोलंदर असं होतं.
सिरीयल किलर राजा कोलंदर प्रयागराज यमुनापार शंकरगढ परिसरातील मूळ रहिवासी होता. 2000 साली अशा काही घटना घडल्या की लोकांसमोर राजा कोलंदरचा खरा चेहरा समोर आला. पत्रकार धीरेंद्र सिंह यांच्या हत्येनंतर राजा कोलंदरचा पर्दाफाश झाला. राजा कोलंदर लोकांना जीवे मारून त्या लोकांचा मेंदू उकळवून त्याचे सूप करुन पीत होता. त्याने 14 जणांची हत्या करुन हे निर्घृण कृत्य केलं. राजा कोलंदर हत्या करुन त्यांचे मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकून देत होता किंवा मृतदेह पुरायचा. त्याच्या या निर्घृण कृत्याचा कोणालाही संशय यायचा नाही.
राजा कोलंदरच्या या कृत्यात त्याचा मेहुणा बछराजदेखील सामील होता. सध्या कोलंदर आणि त्याचा मेहुणा तुरुंगात बंद आहे. मृतदेहाचे तुकडे करुन व मेंदू शिजवून खाल्ल्यास बुद्धी तल्लख होईल आणि अपार शक्ती मिळेल, या समजूतीपायी राजाने निष्पाप लोकांचे खून केले. इतकंच नव्हे तर कोलंदरने त्याने केलेल्या पापांची माहिती एका डायरीत लिहून ठेवली होती. जेव्हा पोलिसांच्या हातात ही डायरी लागली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
राजा कोलंदर अद्यापही पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणी 11 वर्षांपर्यंत सुनावणी सुरू होती. 1 डिसेंबर 2012 रोजी अलाहबादच्या सत्र न्यायाधीक्षांनी मेहताब अहमदने राजा कोलंदर आणि त्याचा साथीदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राजा कोलंदर अद्यापही तुरुंगात शिक्षा भोगत आहे.