टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला

Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. यामुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 18, 2025, 12:16 PM IST
टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला title=

Morne Morkel exits India camp: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांचे वडील अल्बर्ट मॉर्केल यांचे निधन (Morne Morkel father passed away)  झाले आहे. ही बातमी समजताच टीम इंडियामध्ये शोककळा पसरली. आता माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल हा दुबईहून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी दुबईमध्ये सराव करत आहे. 

मॉर्केलचे वडील होते क्रिकेटपटू 

मॉर्केलचे वडील अल्बर्ट हे देखील क्रिकेटपटू होते. त्यांना दक्षिण आफ्रिकेत लिस्ट ए मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. अल्बर्ट हे 74 वर्षांचे होते. एल्बी मोर्केल आणि मालक मोर्केल असे दोन मॉर्नी मॉर्केलला भाऊ आहेत. एल्बी मोर्केल आणि मिलन मोर्केल हा देखील दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळलेला आहे. एल्बी ला 1 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. तो दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तर मिलन मोर्केलने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले.

हे ही वाचा: Champions Trophy 2025: कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज का लावण्यात आला नाही? PCB ने दिले उत्तर

 

मॉर्केल नुकताच झाला होता गोलंदाजी प्रशिक्षक

15 फेब्रुवारीला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेसाठी दुबईला पोहोचला तेव्हापासून मॉर्केल संघासोबत होता. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तो गेल्या वर्षी संघात सामील झाला होता. त्याने माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांची जागा घेतली होती. पारस यांचा कार्यकाळ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपला. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाच्या गोलंदाजीच्या कामगिरीवर मॉर्केल याच्यावर टीका झाली होती. 

हे ही वाचा: टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या सेनेचा लूक तुम्ही पहिला का?

 

गंभीरच्या सांगण्यावरून मॉर्केल झाला होता गोलंदाजी प्रशिक्षक 

मॉर्ने मॉर्केलने यापूर्वी पाकिस्तान आणि लखनऊ सुपरजायंट्ससोबतही काम केले होते. त्यावेळी गौतम गंभीर हा लखनऊचा मार्गदर्शक होता आणि मॉर्केलने फ्रँचायझीच्या गोलंदाजीची कामगिरी कशी सुधारली हे त्याला आवडले. यामुळेच बीसीसीआयला राष्ट्रीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्केलची निवड करण्यास सांगितले आणि बोर्डाने त्याची विनंती मान्य केली. भारतीय गोलंदाज आर विनय कुमारपेक्षा मॉर्केलला प्राधान्य देण्यात आले.

हे ही वाचा: पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत

 

भारताच्या मॅचेस कधी आहेत? 

  • 20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध बांग्लादेश, ठिकाण - दुबई
  • 23 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, ठिकाण - दुबई
  • 2 मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच, ठिकाण - दुबई