टाटांची कृपा! TCS चे लाखो कर्मचारी पगारवाढीस पात्र; पाहा कोणाला कसा होणार फायदा

TCS Incriment: फेब्रुवारी महिना सुरु झालेला असताना जिथं एकिकडे देशाची आर्थिक पुनर्बांधणी होत असते त्याचप्रमाणं देशातील अनेक संस्थाही कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं.   

सायली पाटील | Updated: Feb 18, 2025, 09:55 AM IST
टाटांची कृपा! TCS चे लाखो कर्मचारी पगारवाढीस पात्र; पाहा कोणाला कसा होणार फायदा  title=
TCS employees to get salary hike increament in march

TCS Annual Increment: फेब्रुवारी आणि मार्च हे महिने अनेक संस्थांमध्ये पगारवाढीचे (Salary Hike) महिने असून, एक मोठा कर्मचारी वर्ग आहे जो वर्षभरात याच महिन्यांची वाट पाहत असतो. वर्षभर जीवन ओतून केलेलं काम, संस्थेची प्रतिष्ठा आणि आपल्याला मिळणारा मोबदला या सर्व गोष्टी विचारात घेत एक प्रामाणिक कर्मचारी म्हणून केलेल्या मेहनतीचं फळ म्हणून या वार्षिक पगारवाढीकडे पाहिलं जातं. याच पगारवाढीची संपूर्यण प्रक्रिया लवकरच देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS मध्ये पार पडणार आहे. 

टीसीएसमध्ये लवकरच कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढीचा फायदा घेता येणार असून, यंदाच्या वर्षी 4 ते 8 टक्क्यांनी ही पगारवाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना काळापूर्वी कंपनी दोन आकडी टक्केवारीमध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ देत होती. पण, त्यानंतर मात्र पगारवाढीचा आकडा एकेरी झाल्याचं पाहायला मिळालं. 

का घटलं पगारवाढीचं सरासरी प्रमाण? 

ET मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार जागतिक आर्थिक संकटामुळे आयटी क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी पगारवाढीवर मर्यादा आणल्या आहेत. कोविड काळाआधी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देत होत्या. पण, त्यानंतर मात्र हे चित्र बदललं. उपलब्ध माहितीनुसार टाटा समुहातील ज्या उद्योग क्षेत्रांमध्ये वर्षभरात भरभरात दिसून आली त्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ दिली जाणार आहे. असं असलं तरीही सरसकट पगारवाढीचा आकडा मात्र निराशाजनक असेल हे खरं. 

40000 फ्रेशर्सच्या हाती कंपनीचं भविष्य... 

2022 या आर्थिक वर्षात टीसीएसनं कर्मचाऱ्यांना सरासरी 10.5 टक्के इतकी पगारवाढ दिली. यानंतर 2024 मध्ये हे प्रमाण 7 ते 9 टक्क्यांवर आलं. आता 2025 मध्ये पगारवाढीचा आकडा आणखी कमी होऊन 4 ते 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. कर्मचारी संख्येविषयी सांगावं तर, सध्याच्या घडीला या कंपनीमध्ये एकूण 6,07,354 कर्मचारी काम करतात. मार्च 2025 पर्यंत कंपनी नव्यानं 40,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असून, 2026 मध्येही नवी भर्ती केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Video: लँड होताच विमान पलटी; Plane Crash नंतर चा व्हिडीओ पाहून म्हणाल हा प्रवास नको रे बाबा! 

काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून घरातून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरह परतण्याचे आदेश देत जे कर्मचारी रिटर्न-टू-ऑफिसचं पालन करतील त्यांना चांगली पगारवाढ आणि बोनस 
असा दुहेरी फायदा मिळेल असंही स्पष्ट केलं होतं.