ICC Champions Trophy 2025: आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या रूपाने पाकिस्तान 24 वर्षांत प्रथमच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सातत्याने काही वाद निर्माण होताना दिसत आहे. आता ताजा वाद भारताच्या झेंड्यावरून झाला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे झेंडे कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. मात्र त्यात भारताचा ध्वज नाहीये. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानला स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले आहे.
पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये भारतीय ध्वज फडकावण्यास नकार दिल्यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. हे प्रकरण तापल्यावर आता पीसीबीने आता प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने (PBC) यावर उत्तर देत सांगितले आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी केवळ पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्याच देशांचे झेंडे स्टेडियममध्ये फडकवले गेले आहेत.
हे ही वाचा: लवकरच रंगणार Champions Trophyचा थरार, जाणून घ्या कधी आहेत टीम इंडियाचे सामने; पाहा संपूर्ण शेड्युल
पीसीबीच्या एका सूत्राने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, “तुम्हाला माहिती आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान भारत आपले सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येणार नाही. कराचीच्या नॅशनल स्टेडियम, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ज्या देशांचे झेंडे फडकवले गेले आहेत जे तिथे खेळायला येणार आहेत." भारत दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलमध्ये खेळणार आहे.
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations. pic.twitter.com/rjM9LcWQXs
— Arsalan (@Arslan1245) February 16, 2025
हे ही वाचा: पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत
कराची स्टेडियमवर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांचे सामने होणार आहेत.
हे ही वाचा: 'हा' क्रिकेटर तुरुंगात भोगत होता शिक्षा, खटला लढणाऱ्या वकिलावरच जडला जीव; जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) स्पर्धा हायब्रीड मोडमध्ये बदलावी लागली. BCCI, PCB आणि ICC यांच्यात एक करार झाला, ज्या अंतर्गत पाकिस्तान क्रिकेट संघ येत्या काही वर्षात भारत-यजमान आयसीसी स्पर्धांमध्ये आपले सामने खेळणार नाही.