... तर राज्यात प्रवासावर बंदी? केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

GBS:  GBS च्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवे संकेत दिले आहेत.  

Updated: Feb 18, 2025, 08:33 AM IST
... तर राज्यात प्रवासावर बंदी? केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत title=
Prataprao Jadhav warning if risk of GBS increases restrictions will be imposed in maharashtra

Guillain Barre Syndrome: राज्यातील GBSचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्रात प्रवासावर बंदी आणली जाऊ शकते, असे संकेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेत. आरोग्य विभागातील अधिका-यांच्या बैठकीनंतर याबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत GBSचे एकूण 210 संशयित रुग्ण आढळून आले असून 182 रुग्णांना GBSची लागण झाल्याचं उघड झालंय. GBS संसर्गजन्य किंवा गर्दीमुळे पसरत असेल, तर महाराष्ट्रात प्रवासावर बंदी घालण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या पर्यटन सहलीवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले. 

पर्यटन सहलींवर नजर 

GBS संसर्गजन्य किंवा गर्दीमुळे पसरत असेल, तर महाराष्ट्रात प्रवासावर बंदी घालण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या पर्यटन सहलीवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.  या आजाराची पुष्टी झाली आहे, तर २८ संशयित रुग्ण आहेत. तसेच आठ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार मृत्यू जीबीएसमुळे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी ४२ रुग्ण पुणे महापालिकेत, ९४ रुग्ण पुणे महापालिकेत समाविष्ट नवीन गावांमध्ये, ३२ पिंपरी-चिंचवडमधील, ३२ पुणे ग्रामीण आणि १० इतर जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी १३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ४१ आयसीयू आणि २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

'राज्यात जीबीएसचा धोका वाढत आहे हा रोग संसर्ग जन्य रोग असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून आगामी काळात मोठ्या यात्रांच्या बाबतीत अधिकाऱ्यांसोबत बसून पुढील निर्णय घेण्यात येतील अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विशेष म्हणजे पुढील महिन्यात देशातील मोठ्या यात्रांपैकी एक असलेली सैलानी यात्रा बुलढाणा जिल्ह्यात पार पडते आणि महत्वाचे म्हणजे या यात्रेसाठी देशविदेशातून लाखो भाविक सैलानीत दाखल होत असतात त्यामुळे GBS चा वाढता प्रभाव लक्षात घेता केंद्र सरकार निर्बंध आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जीबीएसचा कोल्हापुरात दुसरा बळी 
रेंदाळ ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या पाच रुग्णांवर उपचार सुरू, एक रुग्ण व्हेंटिलेटर वर आहे.

पुण्यात खासगी ‘आरओ’ प्रकल्पांसाठी नियमावली

प्रकल्पचालकांनी पाण्याची सातत्याने तपासणी करून घेणे बंधनकारक आहे अशा सूचना पुणे महानगरपालिकेने दिल्या आहेत. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी भागात जीबीएस रुग्ण आढळून आले होते. या भागाला ज्या खासगी शुद्धीकरण प्रकल्पातून (आरओ) पाणी दिले जाते, ते पाणी दूषित असल्याचे समोर आल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने खासगी ‘आरओ’ प्रकल्पांसाठी नियमावली तयार केली आहे.