टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या सेनेचा लूक तुम्ही पहिला का?

Team India New Jersey: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी सोमवारी लाँच करण्यात आली. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या  खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 18, 2025, 10:21 AM IST
टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या सेनेचा लूक तुम्ही पहिला का? title=

Champions Trophy India Jersey: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सगळेच संघ तयार झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचीही जोरदार तयारी झाली आहे. टीम इंडियाची नवीन जर्सी 17 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आली. बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग आणि इतर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान सर्वांचे लक्ष नवीन जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोकडे होते. सर्व वादांना पूर्णविराम देत भारतीय संघाने जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले आहे. यामुळेच भारताची जर्सी आता खूप चर्चेत आली आहे. 

भारतीय जर्सीवर आहे लोगोसह पाकिस्तानचे नाव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ने ICC पुरस्कार आणि टीम कॅप ऑफ द इयर मिळालेल्या भारतीय खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये, खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी त्यांच्या नवीन जर्सीसोबत फोटोशूट करताना दिसत आहेत. त्याच्या जर्सीवर स्पर्धेचा लोगो आणि यजमान पाकिस्तानचे नाव लिहिले आहे. स्पर्धेच्या अधिकृत लोगोचा भाग म्हणून भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसेल अशी अटकळ होती. मात्र, भारतीय संघ आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आधीच सांगितले होते.

हे ही वाचा: Champions Trophy 2025: कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज का लावण्यात आला नाही? PCB ने दिले उत्तर

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

पहिल्यांदाच छापले गेले नाव 

भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्याची अलीकडच्या काळात ही पहिलीच वेळ आहे. आशिया चषक 2023 चे यजमानपदही पाकिस्तानच होते, पण त्याचे नाव कोणत्याही संघाच्या जर्सीवर नव्हते.

हे ही वाचा: पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत

 

ICC चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणाऱ्या टीम्स

  • ग्रुप ए - भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश
  • ग्रुप बी - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच कधी?

23 फेब्रुवारीला दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धींचा हाय व्होल्टेज मुकाबला रंगणार आहे. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.त्याच पराभवाची परतफेड करण्याची टीम इंडियाला संधी आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान 5 वेळा आमनेसामने आलेत त्यावेळा 2 वेळा भारतानं विजय मिळवला आहे आणि 3 वेळा पाकिस्ताननं विजयी झाला आहे.

हे ही वाचा: लवकरच रंगणार Champions Trophyचा थरार, जाणून घ्या कधी आहेत टीम इंडियाचे सामने; पाहा संपूर्ण शेड्युल

 

भारताच्या मॅचेस कधी आहेत? 

  • 20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध बांग्लादेश, ठिकाण - दुबई
  • 23 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, ठिकाण - दुबई
  • 2 मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच, ठिकाण - दुबई