विकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध

Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे.   

Updated: Feb 18, 2025, 11:24 AM IST
विकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध title=
(प्रतिकात्मक छाया) / chhatrapati Sambhaji maharaj chhaava wikipedia objectionable content controversy demand to remove these context

Chhatrapati Sambhaji Maharaj : 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षक वर्गानं या चित्रपटाला प्रशंसनीय प्रतिसाद दिलेला असतानाच विकीपिडीयामुळं मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

विकिपिडियाचा माहितीचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो. विकिपिडियावरील खोडसाळ माहितीमुळं जाणिवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय. शंभूराजांबाबतही खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी झी 24 तासनं मोहीम हाती घेतली आहे. 

शंभूराजांबाबतचा तो खोडसाळा मजकूर हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तो मजकूर न हटवल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय. आश्चर्याची बाब म्हणजे विकिपीडिया ने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये अधिकच संताप होत आहे.