12 वर्षांपासून एकटीच साजरा करते वाढदिवस; बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा....

बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीने एक मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. मुलाखतीत तिने तिच्या वाढदिवस साजरा करण्याच्या परंपरेबद्दल सांगितले आहे. जाणून घ्या, कोण आहे ही लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी?

Updated: Feb 18, 2025, 12:22 PM IST
12 वर्षांपासून एकटीच साजरा करते वाढदिवस; बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा.... title=

Sunita Ahuja in Interview: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहूजा ही स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. ती मुलाखतीत नेहमीच मनमोकळेपणाने गप्पा मारते आणि तिने मुलाखतीत व्यक्त केलेल्या गोष्टी या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतात. नुकताच, कर्ली टेल्स म्हणजेच कामिया जानीने सुनीताची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत सुनीताने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या. 

यादरम्यान, सुनीताने तिचा वाढदिवस कसा साजरा होतो? याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. तिच्या वाढदिवसाची अनोखी परंपरा आणि ड्रिंकसाठीचे प्रेम तिने मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. ड्रिंक्सवर खूप प्रेम असल्याचे तिने मुलाखतीत सांगितले. 

सुनीताची आवड

मुलाखतीदरम्यान, सुनीता म्हणाली, "माझ्या घरातील बार काउंटर हे माझं सर्वात आवडतं ठिकाण आहे. याठिकाणी मी माझ्या आवडत्या ड्रिंकसोबत एन्जॉय करते. जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मला ड्रिंक करयला खूप आवडते, जसं की माझ्या मुलांच्या वाढदिवसादिवशी तसेच भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहताना मी ड्रिंक्स एन्जॉय करते. मात्र, मी दररोज ड्रिंक करत नाही, फक्त रविवारी मी ड्रिंक्स एन्जॉय करते कारण तो माझा चीट डे आहे."

हे ही वाचा: Box Office वर 'छावा'ची गर्जना; लवकरच 200 Cr क्लबमध्ये....

 

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत

सुनीताने मुलाखतीत तिचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत तसेच परंपरेबद्दल खास बाब सांगितली. सुनीता आहुजाने सांगितले की, गेल्या 12 वर्षांपासून ती एकटीच वाढदिवस साजरा करत आहे. अनेकांना आपला वाढदिवस मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो. मात्र, सुनीता तिच्या वाढदिवसाचा खास दिवस एकट्याने घालवायला पसंत करते. ती म्हणाली, "आता मला माझ्यासाठी जगायचे आहे." सुनीता तिच्या वाढदिवसादिवशी सकाळी मंदिरात किंवा गुरुद्वारामध्ये जाते आणि प्रार्थना करते. नंतर घड्याळात रात्रीचे 8 वाजल्यावर लगेच ती वाईनची बाटली उघडते, केक कापते आणि एकटीच त्या दिवसाची संध्याकाळ एन्जॉय करत असल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं.