जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय. त्यामुळे आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
जामीन अर्जावर आज सुनावणी झाली नाही तर सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय.
काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या सलमान खानला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच १० हजारांचा दंडही ठोठावला होता. शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार होती पण न्यायालयाने सुनावणी न करता निर्णय राखून ठेवला. त्यामुळे सलमानला शुक्रवारची रात्रही तुरुंगात काढावी लागली. आता न्यायाधीशांची बदली झाल्याने सलमानसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बिष्णोई समाजाच्या वकिलांच्या मते, राजस्थानमधील न्यायाधीशांची बदली होणं ही नियमित प्रक्रिया आहे. न्यायाधीशांची बदली ही एप्रिल महिन्यातच होत असते. त्यामुळे ही बदली झाली असेल. यात दुसरे काहीही नाही. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे जोधपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर के जोशी यांचीही बदली करण्यात आलेय. त्यामुळे जामीन अर्जावर नवीन न्यायाधीश काय निर्णय देतात, याची उत्सुका आहे.