Jaya Bachchan Mother Indira Bhaduri Died: बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या आई इंदिरा भादुरी (Indira Bhaduri) यांचं निधन झालं. इंदिरा भादुरी या 94 वर्षांच्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार जया बच्चन आणि अभिषेक बच्चने हे सध्या भोपाळमध्येच (Bhopal) आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा भादुरी या रुग्णालयात दाखल होत्या. इंदिरा भादुरी यांच्या मणक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची तब्येत सुधारण्याऐवजी आणखी बिघडत गेली. इंदिरा याच्या प्रकृतीची माहिती मिळताच मंगळवारी रात्री उशीराच अभिषेकला बरोबर घेत जया बच्चन यांनी भोपाळ गाठलं.
चार्टर प्लेनने इतर कुटुंबिया भोपाळला पोहोचले
मीडिया रिपोर्टनुसार बच्चन कुटुंबातील इतर सदस्य चार्टर्ड प्लेनने भोपाळला पोहोचत आहे. 94 वर्षांच्या इंदिरा भादुरी या भोपालच्या श्यामल हिल्स इथल्या अंसल अपार्टमेंटमध्ये एकट्या राहात होत्या. इंदिरा भादुरी यांचे पती म्हणजे जया बच्चन यांचे वडील तरुण भादुरी हे पत्रकार आणि लेखक होते. 1996 मध्ये तरुण भादुरी यांचं निधन झालं. त्यानंतर इंदिरा भादुरी या एकट्याच राहात होत्या. दिवाळीच्या आधी घडलेल्या या घटनेने भादुरी आणि बच्चन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जया बच्चन यांना दु:ख अनावर
जया बच्चनचं आई इंदिरा भादुरी यांच्यावर खूप प्रेम होतं, आईच्या जाण्याने जया बच्चन यांना दु:ख अनावर झालं आहे. जया आणि अमिताभ यांचं लग्न बंगाली पद्धतीने व्हावं अशी इंदिरा भादुरी यांची इच्छा होती. पण जया-अमिताभ बच्चन यांचं लग्न घाईघाईत उरकण्यात आलं होतं. लग्नांतर जया आणि अमिताभ लंडन गेले. मायदेशी परतल्यानंतर भोपाळमध्ये त्यांचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.