ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? खाजगी पार्टीतील फोटो आले समोर

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचे खाजगी पार्टीमधील फोटो व्हायरल झाले आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 23, 2024, 05:32 PM IST
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? खाजगी पार्टीतील फोटो आले समोर  title=

Aishwarya Rai Photo: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेक वेळा अभिषेक बच्चन ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत दिसत नाही. त्यामुळे अनेकदा घटस्फोटाच्या अफवा येऊ लागतात. 

आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. ऐश्वर्या रायच्या घरी बर्थडे पार्टी होती. ज्यामध्ये अभिषेक बच्चन दिसला नाही. बर्थडे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ऐश्वर्या आणि आराध्या फॅमिलीसोबत पोज देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्या आणि चुलत बहिणीसोबत उभी आहे. तिच्यासोबत तिची आई वृंदा राय देखील दिसत आहे. हा फोटो ऐश्वर्याच्या चुलत बहिणीच्या बर्थडे पार्टीचा आहे. जो तिने स्वतः शेअर केला आहे.

अभिषेक बच्चन पार्टीमध्ये का दिसला नाही? 

अभिषेक बच्चन नुकताच 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतला आहे. तो मुंबईत विमातळावर दिसला. मुंबईत असून देखील तो या पार्टीत दिसला नाही. त्यामुळे चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगी आहे. जिचे नाव आराध्या आहे. ऐश्वर्याने बच्चन कुटुंबासोबत नाही तर मुलगी आराध्यासोबत अनंत अंबानी यांच्या लग्नात हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर येऊ लागल्या. 

ऐश्वर्या राय ही शेवटची 'पोन्नियिन सेलवन 2' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने आपल्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. अभिषेक बच्चन हा लवकरच 'हाऊसफुल 5' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.