Trending Quiz: आजकाल घर,ऑफिस असो मॉल्स..सर्वच ठिकाणी उंचच्या उंच इमारती झाल्या आहेत. त्यामुळे यात तळमजल्यावरुन शेवटच्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी छानश्या लिफ्ट असतात. यात शिरलं की तिथल्या आरशामध्ये प्रत्येकजण स्वत:ला बघतो. पण या ठिकाणी आरसा लावण्याची गरज काय? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? यामागे एक अनोखं कारण आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं.
जपानच्या एलिव्हेटर असोसिएशनच्या गाईडलाईननुसार प्रत्येक लिफ्टमध्ये काचा लावणं अनिवार्य करण्यात आलं. पण काचा लावणं हे सजावटीसाठी नाही तर लोकांच्या मानसिक आरोग्यवर लक्ष देणं हा यामागचा खरा उद्देश आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिफ्टमध्ये लावण्यात आलेल्या काचेमुळे मानसिक स्वास्थ्य कसं सुधारतं?
क्लॉस्ट्रोफोबिया हा शब्द तुम्ही आधी ऐकला असेल. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लोकांना लहान किंवा अरुंद जागेची भीती वाटते. बरीच लोकं लिफ्ट किंवा लहान ठिकाणी जाण्यापासून घाबरतात. अनेकांना गुदमरायला लागू लागंत, काही लोकांच्या हृद्याचे ठोके वाढतात. यामुळे हार्ट अटॅक येण्याची धोकाही वाढतो. पण आरसा लावल्यामुळे लिफ्ट मोठी वाटू लागते. लिफ्टमध्ये काचा नसल्यास लिफ्टचा आकार लहान वाटतो. पण काचा असल्यामुळे लिफ्ट मोठी आणि मोकळी वाटते. यामुळे लोकांना जीव गुदमरत नाही.
लिफ्टमध्ये आरसा लावण्यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे लोकांचं लक्ष भटकतं. उंच इमारतीत लिफ्टमध्ये बराच वेळ जातो. अशात लिफ्टमध्ये आरसा असल्याने लोकं स्वत:ला आरशात पाहात असतात. यामुळे त्यांच्या मनात लिफ्ट किती उंचीवर जात आहे याची भीती राहात नाही.
लिफ्टमध्ये आरसा लावण्याचं आणखी एक मोठं कारण आहे. आपण चित्रपटात अनेकवेा पाहिलं असेल लिफ्टमध्ये एखादा अनोळखी व्यक्ती मागून एखाद्याच्या तोंडावर रुमाल ठेऊन किंमीत वस्तूंची चोरी करतोत. पण लिफ्टमधल्या काचेमुळे आपल्या मागे, पुढे आणि आजुबाजूला कोण उभं आहे याची माहिती मिळते. एखादी संशायस्पद हालचाल जाणवल्यास तात्काळ सतर्क होता येतं. या सर्व उद्देशानेच लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आलेला असतो.