Maha Shivratri 2025 : महाशिवरात्रीला ‘या’ रंगाचे कपडे चुकून घालू नका! अन्यथा महादेव होतील क्रोधीत

Maha Shivratri 2025 : अवघ्या काही दिवसांवर महादेवला समर्पित महाशिवरात्रीचा सण येऊन ठेपला आहे. यादिवशी शिवलिंगाला जल अर्पण करुन उपवास केला जातो. शिवपुराणनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये सांगण्यात आलंय.    

नेहा चौधरी | Updated: Feb 21, 2025, 08:23 PM IST
Maha Shivratri 2025 : महाशिवरात्रीला ‘या’ रंगाचे कपडे चुकून घालू नका! अन्यथा महादेव होतील क्रोधीत

Maha Shivratri 2025 : महाशिवरात्रीचा उत्सह अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या बुधवारी 26 फेब्रुवारी देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. यादिवशी भगवान महादेव आणि पार्वतीची पूजा करण्यात येते. शिवलिंगावर या दिवशी जलभिषेक करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला शिवपुराणानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमात जर चुका केल्यास तुम्हाला भगवान शंकराच्या क्रोधाला समोर जावं लागेल.

महाशिवरात्रीला या गोष्टी नक्की करा!

स्वस्तिक 

या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर लाल सिंदूर लावून स्वस्तिक किंवा शुभ लाभाचे प्रतीक लावणे चांगले मानले जाते. असे केल्याने तुम्हाला वर्षभर समृद्धी मिळते आणि तुमच्या घराचे कोणत्याही संकटांपासून संरक्षण होते.

देवाची मूर्ती

घरात देवाचे मंदिर किंवा मूर्ती ठेवणे निषिद्ध मानले जातं, मात्र जर तुम्हाला घरी मूर्ती स्थापित करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मंदिराच्या ईशान्य दिशेला पार्वती आणि गणेशासह भगवान शिवाची मूर्ती स्थापित करा. हे तुम्हाला नेहमीच शुभ परिणाम देईल.

जर तुम्ही उपवास करत असाल तर...

जर तुम्ही उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठा आणि कोमट पाण्यात तीळ घालून आंघोळ करा. नवीन कपडे घालणे आवश्यक नसले तरी, स्वच्छ कपडे घाला. 

अशी करा शिवपूजा

शिवलिंगावर पाणी अर्पण करणे अत्यंत महत्त्व आहे. फक्त स्वच्छ आणि शुद्ध पाणी अर्पण करा किंवा त्यात गंगाजल, मध, चंदन आणि साखर मिसळा, मात्र नंतर ते तुमच्या तळहातांनी चोळा. असे मानले जाते की यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

हेसुद्धा वाचा - Maha Shivratri 2025 : 26 की 27 फेब्रुवारी कधी आहे महाशिवरात्री? यंदा भद्राची सावली; महादेवावर ‘या’ वेळी करा जलाभिषेक

दुधाचे दान

भगवान शिव यांना दूध आवडते, पण ते वाया घालवू नका. एखाद्याला दूध अर्पण करा किंवा देवाला खीर अर्पण करा.

मंत्राचा जप करा 

पूर्ण विधीपूर्वक जल अभिषेक केल्यानंतर, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला विसरू नका. याशिवाय शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा.

उपवासात ही काळजी घ्या

तुम्ही दिवसभर दूध आणि फळे घेऊ शकता, मात्र सूर्यास्तानंतर फळे खाण्यास मनाई आहे. याशिवाय, या दिवशी संपूर्ण रात्र जागृत राहून ध्यान आणि चिंतन करा. 

108 नावे  
या दिवशी भगवान शिवाची आरती केल्याने आणि त्यांच्या 108 नावांचा जप केल्याने तुमची पूजा पूर्ण होते, भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात.

या रंगाचे कपडे घालू नका!

शिव पुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे घालू नका. असं म्हटलं जातं की भगवान शिव यांना काळा रंग आवडत नाही. काळे कपडे परिधान केल्याने ते क्रोधीत होता, म्हणून या दिवशी ते टाळावे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)