Box Office Collection : भारतात नाही परदेशात 'राधे'चा बोलबाला

दुबई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चित्रपटाने चांगला गल्ला जमा केला आहे. 

Updated: May 15, 2021, 07:47 PM IST
Box Office Collection : भारतात नाही परदेशात 'राधे'चा बोलबाला title=

मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'राधे' चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे. भारतात कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित होवू शकलेला नाही. पण दुबई ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चित्रपटाने चांगलाचं गल्ला जमा केला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्यादिवशी परदेशात 'राधे' चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया बॉक्स ऑफिसच्या दुसर्‍या दिवसाच्या दिवशी 69 स्क्रिन कलेक्शन 74 हजार 966 डॉलर म्हणजेचं 54.93 लाख रूपयांपर्यंत पोहोचलं आहे.  न्यूझीलंडमधील 26 स्क्रिनचे कलेक्शन 13 हजार 607 डॉलर म्हणजेच 9.97 लाख  रूपयांपर्यंत पोहोचलं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सांगायचं झालं तर चित्रपटाने दोन दिवसांत 64.9 लाख रूपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगली मजल मारली आहे.  UAE मध्ये देखील सलमानची जादू पाहायला मिळाली. युएईमधील पहिल्या प्रीमिअरच्या वेळी सलमान खानच्या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 'राधे' चित्रपटाने UAEमध्ये 40 लाख डॉलर म्हणजे 2.91 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. जवळपास 1 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राधे चित्रपट परदेशात रूपेरी पडद्यावर दाखल झाला. पण भारतात मात्र ZEE 5या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ZEE 5वर आतापर्यंत 1.5 मिलियन प्रेक्षकांना 'राधे' चित्रपट पाहिला आहे.