मुंबई : प्रसिद्धी मिळाल्या नंतर शत्रूंची संख्या देखील वाढते. लोकप्रियतेमुळे तयार झालेले शत्रू बदला घेण्यासाठी कट रचतात. त्यामुळे अनेक दुर्घटना झालेल्या नेहमीच कानावर येत असतात. तर आता ज्या आलिशान कार मध्ये अमेरिकन रॅपरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या कारचा लिलाव झाला आहे. फक्त १७ लाखांमध्ये त्या कारची विक्री झाली. त्यामुळे ही कार आता चर्चेचा विषय बनली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ७ सप्टेंबर १९९६ साली काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये अमेरिकी रॅपर तुपैक शकूरची हत्या केली गेली. लास वेगास येथे शकूरला याच बीएमडब्ल्यू ७ सीरिज गाडीत बसला होता. तेव्हा त्याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. गोळी झाडल्यानंतर ६ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
तुपैक शकूरला मारण्यासाठी गाडीवर चालवलेल्या चार गोळ्यांचे छेद आजही गाडीवर स्पष्ट दिसतात. आता लाल वेगासच्या डीलर सेलेब्रिटी कार्स लाल वेगास ही कार विकत आहे. कमी वयात दमदार कामगिरी करणाऱ्या तुपैकने ७५ मिलियन पेक्षा जास्त अल्बम विकले आहेत. हा त्याच्या नावावर एक रेकॉर्ड आहे.
सर्वात जास्त अल्बम विकल्या जाणाऱ्या कलाकारांमध्ये तुपैक शकूर याचं नाव आजही आवर्जुन घेतलं जातं. पण या कलाकाराची हत्या अद्यापही एक रहस्य आहे. तुपैक नेहमी सामाजिक मुद्द्यांवर रॅप लिहित असे. त्याचे काही रॅप आजही प्रसिद्ध आहेत. त्याला 2Pac या नावाने देखील ओळखले जात होते.