Celebrity missing from Kenya : बॉलिवूडमधून रोज अनेक चांगल्या आणि वाईट घटना समोर येत असतात. सध्या घडलेल्या एका घटनेमुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. स्टार आणि बालाजीचे माजी वरिष्ठ कार्यकारी झुल्फिकार खान (Zulfiqar Khan) 21 जुलै 2022 पासून केनियामध्ये बेपत्ता आहे (missing from Kenya ). मनोरंजन उद्योगातील दिग्गज झुल्फिकार 48 वर्षांचा आहे. तो बेपत्ता झाल्यापासून, झुल्फिकारच्या कुटुंबाने भारत सरकारला त्याचा शोध घेण्याची विनंती केली आहे, परंतु अद्याप त्याच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आले नाही. त्यामुळे झुल्फिकार खानच्या मित्रांनी #BringZulfiBack ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.
बालाजीचे माजी वरिष्ठ कार्यकारी झुल्फिकार खान बेपत्ता
झुल्फिकार खानने यावर्षी मे महिन्यात बालाजी टेलिफिल्म्सच्या सीओओ पदाचा राजीनामा दिला होता. जुलैमध्ये तो केनियाला सुट्टीसाठी गेला होता आणि 24 जुलैला खान भारतात परतनार होता. मात्र, 21 जुलैपासून तो संपर्कात नसल्यामुळे कुटुंबिय चिंतेत आहे. झुल्फिकारला शोधण्यासाठी कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि केनियातील भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे.
झुल्फिकारचे नातेवाईक अकील हुसैन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'त्याने आम्हाला काही भारतीय लोकांसोबत केनियामध्ये एका पार्टीत जाणार असल्याचं सांगितलं होतं.
रात्री उशिरा एका स्थानिक टॅक्सी चालकासह झुल्फिकार एका व्यक्तीला घेऊन निघाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीचे सर्व दरवाजे उघडे असल्याचे दिसले, मात्र गाडीचं इंजिन सुरूच होतं. मात्र, गाडीत कोण होते हे अद्याप समजू शकलेले नाही.
केनियातील प्रसिद्ध वकील अहमद नासिर अब्दुल्लाही यांनी ही गोष्ट सांगितल्यावर झुल्फिकारच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाली. यासोबतच अहमद नसीर यांनी केनिया कोर्टात याच्या तपासासाठी याचिका दाखल केली आहे.
त्याचबरोबर झुल्फिकारचे कुटुंबीय सतत फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचा फोन बंद असल्याचं कळत आहे. सध्या झुल्फिकार बेपत्ता झाल्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली आहे.